India vs South Africa 2nd Test Match Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना आजपासून खेळवला जात आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सेंच्युरियनमधील पहिली कसोटी जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला दुसरी कसोटी जिंकून मालिका बरोबरीत सोडवायची आहे. त्यामुळे भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने दक्षिण आफ्रिकेच्या सलामीला जोडीला तंबूत पाठवत शानदार सुरुवात करुन दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का एडन मार्करमच्या रूपाने बसला. चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. यशस्वी जैस्वालने मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये अप्रतिम झेल घेतला. मार्करमने १० चेंडूत दोन धावा केल्या. यानंतर मोहम्मद सिराजने भारताला मोठे यश मिळवून दिले. मागील सामन्यात शतक झळकावणाऱ्या डीन एल्गरला त्याने सहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर क्लीन बोल्ड केले. एल्गरला १५ चेंडूत केवळ चार धावा करता आल्या. दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या दोन विकेट्सवर आठ धावा आहे. टोनी डी जॉर्गी आणि ट्रिस्टन स्टब्स क्रीजवर आहेत.

मोहम्मद सिराजला मिळाले तिसरे यश –

ट्रिस्टन स्टब्सच्या रूपाने दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का बसला. स्टब्स ११ चेंडूत तीन धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. नवव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. त्याला जसप्रीत बुमराहने कर्णधार रोहित शर्माच्या हाती झेलबाद केले. दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या तीन विकेट्सवर ११ धावा होती. मोहम्मद सिराजला तिसरे यश टोनी डी जॉर्जीच्या रूपाने मिळाले. १० व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सिराजने जॉर्जीला यष्टिरक्षक केएल राहुलकडे झेलबाद केले. दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या आता ४ विकेटवर १५ धावा आहे. डेव्हिड बेडिंगहॅमसोबत काइल वेरेयन क्रीजवर आहे.

हेही वाचा – IND vs SA Test : रोहितच्या कर्णधारपदावर माजी क्रिकेटपटूने उपस्थित केले प्रश्न! सांगितली भारतीय संघाची खरी समस्या

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका: डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्करम, टोनी डी जिओर्गी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेयन (यष्टीरक्षक), मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa 2nd test updates south africa lost four wickets for 15 runs at newlands stadium in cape town mohammad siraj vbm