IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताने सात गडी राखून जिंकला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतासमोर २७९ धावांचे लक्ष्य ठेवले आणि भारताने तीन गडी गमावून हे लक्ष्य गाठले. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने तर दुसरा सामना भारतीय संघाने आपल्या नावे केला होता. त्यानंतर आज मालिकेतील अखेरचा व निर्णायक सामना दिल्ली येथे खेळला जाईल.

टीम इंडियातील प्रमुख गोलंदाज मोहम्मद सिराजने या मालिकेत आतापर्यंत शानदार गोलंदाजी केली आहे. किफायतशीर असण्यासोबतच त्याने बळीही घेतले आहेत. जसप्रीत बुमराहच्या जागी टी२० विश्वचषक संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत असलेला सिराज या शेवटच्या सामन्यात निवडकर्त्यांना आपल्या पूर्ण ताकदीने प्रभावित करू शकतो. राहुल त्रिपाठी आणि रजत पाटीदार एकदिवसीय पदार्पणासाठी सज्ज आहेत पण त्यांना आजच्या सामन्यात कितपत संधी मिळेल याबाबत मात्र साशंकता आहे. रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यापूर्वी शाहबाज अहमदला संधी मिळाली होती. रवी बिश्नोईच्या जागी कर्णधार धवनने त्याला संधी दिली आणि त्याने एक गडी देखील बाद केला होता. ऋतुराज गायकवाडलाही गेल्या सामन्यात संघात स्थान देण्यात आले नव्हते त्याच्या जागी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वॉशिंग्टन सुंदरचा समावेश करण्यात आला होता. रांची एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर मालिकेचा निर्णायक सामना दिल्लीत खेळला जाणार आहे. शिखर धवन आजच्या सामन्यात गोलंदाजीत बदल करण्याची शक्यता आहे.

IND vs ENG Shubman Gill scores seventh ODI century against England in Ahmedabad
IND vs ENG: शुबमन गिलने मोडला वर्ल्ड रेकॉर्ड! वनडेमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
IND vs ENG Shubman Gill scores seventh ODI century
IND vs ENG : टीम इंडियाच्या ‘प्रिन्स’ची कमाल!…
Virat Kohli 73rd ODI Fifty in IND vs ENG 3rd ODI
IND vs ENG: अखेरीस प्रतिक्षा संपली! विराट कोहलीचं शानदार वनडे अर्धशतक, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतासाठी अजून एक आनंदाची बातमी
Mitchell Starc withdraws from Champions Trophy 2025 for Personal reasons from Australia squad
Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलियाला आणखी एक झटका! मिचेल स्टार्कने अचानक चॅम्पियन्स ट्रॉफीतून घेतली माघार, काय आहे कारण?
Why India And England Players Are Wearing Green Armbands in IND vs ENG 3rd ODI
IND vs ENG: भारत-इंग्लंड दोन्ही संघ हातावर हिरवी पट्टी बांधून का मैदानावर उतरले? काय आहे कारण?
IND vs ENG Rohit Sharma Wicket
IND vs ENG: रोहित शर्मा शतकानंतर पुन्हा अपयशी, १ धाव करत बाद, फिल सॉल्टच्या डाइव्हिंग कॅचने वेधलं सर्वांचे लक्ष
Allah Ghazanfar will miss the IPL 2025 season and Champions Trophy 2025 due to the injury
Champions Trophy 2025 : मुंबई इंडियन्सला IPL 2025 पूर्वी मोठा धक्का! ‘हा’ स्टार खेळाडू संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडल्याने वाढली चिंता
Jasprit Bumrah Ruled Out of Champions Trophy 2025 Due to Lower Back Injury
Champions Trophy: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, भारताला मोठा धक्का; BCCIने बदली खेळाडूची केली घोषणा
Women's Premier League 2025 Schedule in Marathi
WPL 2025 Schedule: WPL 2025चे संपूर्ण वेळापत्रक! कधीपासून होणार सुरूवात, कोण आहेत संघांचे नवे कर्णधार? सर्व माहिती वाचा एकाच क्लिकवर

हेही वाचा :   भारत-द.आफ्रिका एकदिवसीय मालिका : भारताचे मालिका विजयाचे ध्येय! ; आज आफ्रिकेविरुद्ध तिसरा व निर्णायक एकदिवसीय सामना

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या वर्षी भारताकडून ३ शतके झळकावली गेली आहेत. शुभमन गिल, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्या बॅटमधून ही शतकपूर्ती झाली. आणखी १६ धावा केल्यानंतर शिखर धवनच्या नावावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात १००० धावा पूर्ण होतील.

भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक),संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान आणि मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका संघ

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), केशव महाराज, जानेमन मालन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नोरखिया, वेन पारनेल, अँडिले फेहलुक्वायो, कगिसो रबाडा, ड्वेनसो, तबरेझ शम्सी. ब्योर्न फोर्टन

Story img Loader