IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताने सात गडी राखून जिंकला. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतासमोर २७९ धावांचे लक्ष्य ठेवले आणि भारताने तीन गडी गमावून हे लक्ष्य गाठले. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने तर दुसरा सामना भारतीय संघाने आपल्या नावे केला होता. त्यानंतर आज मालिकेतील अखेरचा व निर्णायक सामना दिल्ली येथे खेळला जाईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीम इंडियातील प्रमुख गोलंदाज मोहम्मद सिराजने या मालिकेत आतापर्यंत शानदार गोलंदाजी केली आहे. किफायतशीर असण्यासोबतच त्याने बळीही घेतले आहेत. जसप्रीत बुमराहच्या जागी टी२० विश्वचषक संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत असलेला सिराज या शेवटच्या सामन्यात निवडकर्त्यांना आपल्या पूर्ण ताकदीने प्रभावित करू शकतो. राहुल त्रिपाठी आणि रजत पाटीदार एकदिवसीय पदार्पणासाठी सज्ज आहेत पण त्यांना आजच्या सामन्यात कितपत संधी मिळेल याबाबत मात्र साशंकता आहे. रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यापूर्वी शाहबाज अहमदला संधी मिळाली होती. रवी बिश्नोईच्या जागी कर्णधार धवनने त्याला संधी दिली आणि त्याने एक गडी देखील बाद केला होता. ऋतुराज गायकवाडलाही गेल्या सामन्यात संघात स्थान देण्यात आले नव्हते त्याच्या जागी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वॉशिंग्टन सुंदरचा समावेश करण्यात आला होता. रांची एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर मालिकेचा निर्णायक सामना दिल्लीत खेळला जाणार आहे. शिखर धवन आजच्या सामन्यात गोलंदाजीत बदल करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :   भारत-द.आफ्रिका एकदिवसीय मालिका : भारताचे मालिका विजयाचे ध्येय! ; आज आफ्रिकेविरुद्ध तिसरा व निर्णायक एकदिवसीय सामना

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या वर्षी भारताकडून ३ शतके झळकावली गेली आहेत. शुभमन गिल, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्या बॅटमधून ही शतकपूर्ती झाली. आणखी १६ धावा केल्यानंतर शिखर धवनच्या नावावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात १००० धावा पूर्ण होतील.

भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक),संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान आणि मोहम्मद सिराज.

दक्षिण आफ्रिका संघ

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन (यष्टीरक्षक), केशव महाराज, जानेमन मालन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नोरखिया, वेन पारनेल, अँडिले फेहलुक्वायो, कगिसो रबाडा, ड्वेनसो, तबरेझ शम्सी. ब्योर्न फोर्टन