Sanju Samson’s first one day century : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संजू सॅमसनला फलंदाजीची संधी मिळाली नाही, तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो केवळ १२ धावांवर बाद झाला, परंतु तिसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळाल्यावर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. जेव्हा भारतीय संघाने आपल्या दोन विकेट्स गमावल्या होत्या, तेव्हा त्याने संयमाने फंलदाजी करत भारतीय संघाचा डाव सावरला. त्याचबरोबर वनडे क्रिकेटमधील आपले पहिले शतक झळकावले. या शतकाच्या जोरावर त्याने स्टार फलंदाज विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली.
संजू सॅमसनने केली विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी –
संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ११४ चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने १०८ धावांची शानदार खेळी केली. या सामन्यात त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत शानदार शतक झळकावले. या शतकानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक झळकावणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला. याआधी विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर वनडेमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना भारताकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावण्याचा अद्भुत पराक्रम केला होता. कोहलीने तीनदा तर संजू सॅमसनने पहिल्यांदाच अशी कामगिरी केली आहे.
बोलंड पार्क, पारल येथे शतके झळकावणारे भारतीय फलंदाज –
सचिन तेंडुलकर (२००१)
सौरव गांगुली (२००१)
संजू सॅमसन (२०२३)
संजूने धवन, सचिन आणि गांगुली यांच्याही विक्रमाशी केली बरोबरी –
संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या भूमीवर वनडे कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. या शतकाच्या जोरावर त्याने शिखर धवन, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली या विक्रमाशी बरोबरी केली. या सर्व फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेत वनडेमध्ये प्रत्येकी एक शतक झळकावले होते. या यादीत विराट कोहली ३ शतकांसह अव्वल स्थानावर आहे.
दक्षिण आफ्रिकेत वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणारे भारतीय फलंदाज –
३ – विराट कोहली
१ – संजू सॅमसन<br>१ – शिखर धवन
१ – रोहित शर्मा
१ – सचिन तेंडुलकर
१ – सौरव गांगुली
१- युसूफ पठाण
१ – डब्ल्यू व्ही रमण