Rajat Patidara failed to make his ODI debut : एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताला आणखी एक खेळाडू मिळाला आहे. रजत पाटीदारने गुरुवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने वनडे कारकिर्दीची सुरुवात केली. मात्र तो पहिल्याच सामन्यात स्वस्तात बाद झला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पर्लमध्ये तिसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रत्येकी एक सामना जिंकून दोन्ही संघ मालिकेत बरोबरीत आहेत. म्हणजेच पर्लमधील तिसरी वनडे जिंकणारा संघ मालिकाही जिंकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रजत पाटीदारचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशकडून खेळणाऱ्या रजतने आतापर्यंत ५२ प्रथम श्रेणी, ५७ लिस्ट ए आणि ५० टी-२० सामने खेळले आहेत. रजत पाटीदार हा आयपीएलमधील विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा सदस्य आहे. ऋतुराज गायकवाडची दुखापत हे देखील रजत पाटीदारच्या पदार्पणाचे एक कारण असल्याचे बोलले जात आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसर्‍या वनडे सामन्यापूर्वी रुतुराज गायकवाड जखमी झाल्याचे सांगण्यात आले. त्याच्या जागी रजत पाटीदारला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.

विराट शिलेदार पदार्पणाच्या सामन्यात ठरला अपयशी –

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या भारताची पहिली विकेट ३४ धावांवर पडली. रजत पाटीदार १६ चेंडूत २२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर साई सुदर्शन १२ चेंडूत १० धावा करून बाद झाला. हेंड्रिक्सने त्याला विकेट्ससमोर पायचीत केले. या सामन्यात केएल राहुलची बॅट चालली नाही. ३५ चेंडूत २१ धावा करून तो बाद झाला. राहुलने आपल्या खेळीत दोन चौकार मारले. व्हियान मुल्डरच्या चेंडूवर तो हेनरिक क्लासेनकरवी झेलबाद झाला.

हेही वाचा – ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष, साक्षी मलिकने घेतला निवृत्तीचा निर्णय; म्हणाली, ‘आम्ही ४० दिवस…’

सॅमसन आणि तिलक यांनी सावरला भारताचा डाव –

संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आहे. भारताने ३४ षटकात ३ विकेट गमावत १५६ धावा केल्या आहेत. संजू सॅमसन ६१ आणि तिलक वर्मा २९ धावांवर नाबाद आहे. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली.
भारतीय प्लेइंग इलेव्हन: केएल राहुल (कर्णधार), रजत पाटीदार, साई सुदर्शन, संजू सॅमसन, तिलक वर्मा, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa 3rd odi match updates rajat patidara failed to make his odi debut vbm
Show comments