IND vs SA 3rd T20 Match Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (१४ डिसेंबर) खेळला गेला. जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने २० षटकांत सात विकेट गमावून २०१ धावा केल्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ १३.५ षटकांत ९५ धावांत गारद झाला. भारताने हा सामना १०६ धावांनी जिंकला. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला. आता तिसरा सामना भारताने जिंकला. अशाप्रकारे तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत संपली.

कुलदीप यादवने सर्वाधिक ५ गडी बाद केले –

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने २० षटकांत सात विकेट गमावून २०१ धावा केल्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ १३.५ षटकांत ९५ धावांत गारद झाला. दक्षिण आफ्रिकेसाठी केवळ तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. डेव्हिड मिलरने ३५, एडन मार्करामने २५आणि डोनोव्हन फरेराने १२धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने सर्वाधिक ५ गडी बाद केले. रवींद्र जडेजाला दोन गडी बाद केले. मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

सूर्याने टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले –

तत्पूर्वी, सूर्यकुमारने त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत तो रोहित शर्मा आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्या बरोबरीने पहिल्या क्रमांकावर आहे. या दोघांचीही प्रत्येकी चार शतके आहेत. सूर्यकुमारने ५६ चेंडूंच्या खेळीत सात चौकार आणि आठ षटकार मारले आणि १०० धावा केल्या. यशस्वी जैस्वालने ४१ चेंडूत ६० धावा केल्या. रिंकू सिंग १४ धावा करून बाद झाला तर शुबमन गिल १२ धावा करून बाद झाला.

हेही वाचा – IND vs AUS : सूर्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाडला चौकार-षटकारांचा पाऊस, शतकाच्या जोरावर रोहितच्या ‘या’ खास विक्रमाशी केली बरोबरी

या चौघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. चार धावा करून जितेश शर्मा हिट विकेटवर बाद झाला. रवींद्र जडेजा चार धावा करून धावबाद झाला. तिलक वर्माला खातेही उघडता आले नाही. मोहम्मद सिराज दोन धावा करून नाबाद राहिला. अर्शदीप खाते न उघडता नाबाद राहिला. केशव महाराज आणि अँडिले फेहलुकवायो यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. या मैदानावर १७ डिसेंबर रोजी पहिला एकदिवसीय सामना होणार आहे.

Story img Loader