या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

India vs South Africa 3rd T20 Highlights, 13 November 2024 : भारतीय संघाने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ११ धावांनी पराभव करत चार सामन्यांच्या टी-२०मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. तिलक वर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने २० षटकांत ६ बाद २१९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाला निर्धारित षटकांत सात विकेट्सच्या मोबदल्यात केवळ २०८ धावाच करता आल्या आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यान्सेनने झुंजार खेळी साकारली. तो जोपर्यंत खेळपट्टीवर होता, तोपर्यंत भारत जिंकेल याची शाश्वती नव्हती. मात्र, तो मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने भारताने विजयावर शिक्कामोर्तब केला. तत्पूर्वी, त्याने १७ चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ५४ धावांचे योगदान दिले.

मार्को यान्सेनने अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावले, जे त्याच्या टी-२० कारकिर्दीतील पहिले अर्धशतक आहे. यान्सेनने संघाला विजयापर्यंत नेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, मात्र अर्शदीपने त्याला अखेरच्या षटकात बाद करत दक्षिण आफ्रिकेची शेवटची आशा संपुष्टात आणली. दक्षिण आफ्रिकेसाठी हेनरिक क्लासेनने २२ चेंडूत एक चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या. अर्शदीपने क्लासेनलाही बाद केले. भारताकडून अर्शदीपने तीन, वरुण चक्रवर्तीने दोन आणि हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेलला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

यासह अर्शदीप सिंग भारताचा टी-२० क्रिकेटमधीले दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. अर्शदीपने क्लासेनला बाद करून भुवनेश्वर कुमारला मागे टाकले. अर्शदीपच्या नावावर आता ९२ विकेट्स असून त्याने जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारला मागे टाकले आहे. त्याच्या पुढे आता फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आहे, ज्याने या फॉरमॅटमध्ये ९६ विकेट घेतल्या आहेत. तत्पूर्वी, तिलक वर्माचे शतक आणि अभिषेक शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर तिसऱ्या टी-२० सामन्यात २२० धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतासाठी, तिलने टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले, ज्यामुळे भारतीय संघ २०० धावांचा टप्पा पार करण्यात यशस्वी ठरला. भारताने टी-२० मध्ये २०० हून अधिक धावा करण्याची या वर्षातील ही आठवी वेळ आहे.

Live Updates

India vs South Africa 3rd T20 Match Highlights, 13 October 2024 : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत ३० टी-२० सामने खेळले गेले आहेत. ज्यापैकी भारताने १८आणि दक्षिण आफ्रिकेने ११ सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला.

20:01 (IST) 13 Nov 2024

IND vs SA : रमणदीपचे आज पदार्पण

रमणदीपचे आज पदार्पण

रमणदीप सिंगला पदार्पणाची कॅप देण्यात आली आहे. म्हणजेच आज तो भारतासाठी पहिला सामना खेळत आहे. केकेआरने नुकतेच रमणदीपला रिटेन केले होते.

19:57 (IST) 13 Nov 2024

IND vs SA : एडन मार्करमच्या बोटाला दुखापत

एडन मार्करमच्या बोटाला दुखापत

दक्षिण आफ्रिकेचे कर्णधार एडन मार्करम, डेव्हिड मिलर आणि हेनरिक क्लासेन हे आपल्या लौकिकाला साजेसे खेळ करू शकले नाहीत. ट्रिस्टन स्टब्स आणि गेराल्ड कोएत्झी यांनी दुसऱ्या सामन्यात संघाला विजय मिळवून दिला. आता अनुभवी फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागणार आहे. रविवारी सेंट जॉर्ज पार्कमध्ये हार्दिक पांड्याला पकडण्याचा प्रयत्न करताना एडन मार्करमच्या बोटाला दुखापत झाली, त्यामुळे तो मैदानाबाहेर राहणार आहे. गेल्या दोन सामन्यांपासून लुथो सिपामालाचा संघात समावेश करण्यात आला आहे.

19:42 (IST) 13 Nov 2024

IND vs SA : अभिषेक शर्माला चांगली खेळी खेळावी लागणार

अभिषेक शर्माला चांगली खेळी खेळावी लागणार

दुसऱ्या T20 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना खूप त्रास दिला आणि भारतीय संघ सहा विकेट्सवर 124 धावाच करू शकला. अभिषेक शर्मा सातत्याने अव्वल स्थानावर अपयशी ठरला आहे. संघव्यवस्थापन संयोजनात बदल करण्याचा विचार करण्यापूर्वी त्याला चांगली खेळी खेळावी लागणार आहे.

19:15 (IST) 13 Nov 2024
IND vs SA : भारतीय फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल

भारतीय फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल

मागील सामन्यात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या त्यांच्या फलंदाजांकडून बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय फलंदाजांना चांगल्या कामगिरीची आशा असेल. 2009 पासून भारताने येथे फक्त एकच T20 सामना खेळला आहे आणि 2018 मध्ये झालेल्या या सामन्यात सहा विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता.

18:57 (IST) 13 Nov 2024

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि दक्षिण आफ्रिका हेड टू हेड रेकॉर्ड

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत २९ टी-२० सामने खेळले गेले आहेत. ज्यापैकी भारताने १७ आणि दक्षिण आफ्रिकेने ११ सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला. प्रोटीजच्या मैदानावर दोन्ही संघ ११ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने सात सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेने चार सामने जिंकले आहेत.

18:54 (IST) 13 Nov 2024

IND vs SA : चाहत्यांना पूर्ण सामना पाहायला मिळणार

चाहत्यांना पूर्ण सामना पाहायला मिळणार

पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळपट्ट्या वेगवान होत्या आणि चेंडू जास्त उसळी घेत होते. गेल्या काही दिवसांतील पावसामुळे तयारी गुंतागुंतीची झाली होती, परंतु दोन्ही सामन्यांच्या दिवसांवर हवामानाचा परिणाम झाला नाही. सेंच्युरियनमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, परंतु सामन्यादरम्यान त्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट चाहत्यांना पूर्ण सामना बघायला मिळू शकते.

18:44 (IST) 13 Nov 2024

IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका तिसऱ्या सामन्याची योग्य वेळ किती?

भारत-दक्षिण आफ्रिका तिसऱ्या सामन्याची योग्य वेळ

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-२० सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू झाला होता. मात्र तिसऱ्या टी-२० सामन्याच्या वेळेत बदल झाला आहे. हा सामना एका तासाने उशिरा म्हणजे भारतीय वेळेनुसार ८.३० वाजता सुरू होईल आणि या सामन्याची नाणेफेक रात्री ८ वाजता होईल. त्यामुळे हा सामना रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. यानंतर, दोन्ही संघांमधील चौथा आणि अखेरचा टी-२० सामना १५ नोव्हेंबर रोजी होणार आहे, जो भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता खेळवला जाईल.

India vs South Africa 3rd T20 Match Highlights, 13 October 2024 : प्रोटीजच्या मैदानावर दोन्ही संघ १२ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने आठ सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेने चार सामने जिंकले आहेत.