IND vs SA 3rd T20I Highlights In Marathi: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-२० सामना सुरू असताना अचानक एका वेगळ्याच कारणामुळे थांबवण्यात आला. मुसळधार पाऊस, खराब हवामान आणि खराब प्रकाशामुळे अनेक सामने थांबलेले आणि रद्द झालेले आपण पाहिले आहेत. पण सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या T20 मध्ये एक विचित्र घटना पाहायला मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारत-दक्षिण आफ्रिका सामना अचानक का थांबवला?

भारताने दिलेल्या २२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या डावात ही घटना घडली. दक्षिण आफ्रिकेच्या डावात अचानक मैदानात किटक, पाखरू येऊ लागली आणि पाहता पाहता इतकी पाखर आली की खेळाडूंना ती त्रास देऊ लागली आणि परिणामी पंचांना सामना थांबवावा लागला.

सेंच्युरियनमधील भारत – दक्षिण आफ्रिकेचा हा सामना दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता सुरू झाला होता. भारताच्या पहिल्या डावात प्रकाश होता. पण दक्षिण आफ्रिकेचा डाव सुरू झाला तेव्हा काळोख झाला होता आणि त्यामुळे मैदानावरील लाईट्स सुरू झाल्या. त्यामुळे प्रकाशाकडे येणारे किटक जमा झाले. मैदानात ठिकठिकाणी प्रकाशासमोर जमा होणारे किटक दिसू लागले, त्यामुळे खेळाडूंनाही अडचणींचा सामना करावा लागत होता. मैदानावर आलेले किटक पाहता दक्षिण आफ्रिकेने केवळ १ षटक फलंदाजी केली आणि पंचांनी सामना थांबवण्याचा निर्णय घेतला. कारण या वातावरणात खेळाडूंनाही त्रास जाणवत होता. हे किडे खेळाडूंच्या कपड्यांमध्येही शिरले होते. त्यानंतर खेळाडूंना मैदान सोडण्यास सांगण्यात आले.

IND vs SA 3rd T20I सामन्यात अचानक मैदानात कीटक का आले?

पावसाळ्यानंतर हे कीटक येतात. कृत्रिम प्रकाश देणार्‍या टॉवरच्या प्रकाशात हे कीटक मोठ्या संख्येने येतात. त्यांचा हा प्रजननाचा काळ आहे. तीन चार दिवस पाऊस झाला की त्यानंतर मादी कीटक नराच्या शोधात असते. वातावरण उष्ण, दमट तसंच जोरदार वारे असं वातावरण कीटकांना पोषक मानलं जातं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa 3rd t20i match stopped due to flying ants engulfed the centurion stadium bdg