IND vs SA 4th T20 Live Updates : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पाच सामन्यांची टी २० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा टी २० आंतरराष्ट्रीय सामना आज (१७ जून) राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झाला. ८२ धावांनी भारताने हा सामना जिंकला. या विजयामुळे भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने सहा बाद १६९ धावा केल्या होत्या. मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना १९ जून रोजी बंगळुरूमध्ये होणार आहे.
युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर एनरिक नॉर्किया अवघी एक धाव करून माघारी परतला आहे. दक्षिण आफ्रिकेची अवस्था ८ बाद ८० अशी झाली आहे.
आवेश खानच्या गोलंदाजीवर केशव महाराज माघारी परतला आहे. श्रेयस अय्यरने त्याचा झेल टिपला. आफ्रिकेची अवस्था सात बाद ७८ अशी झाली आहे.
आवेश खानच्या गोलंदाजीवर मार्को यान्सन झेलबाद झाला. ऋतुराज गायकवाडने त्याचा झेल टिपला. त्यापूर्वीच्या चेंडूवर यान्सनला दुखापत झाली होती.
आवेश खानच्या गोलंदाजीवर ऋतुराज गायकवाडने डुसेनचा अप्रतिम झेल टिपला. डुसेन बाद झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी संकटात आली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज डेव्हिड मिलर त्रिफळाचित झाला. हर्षल पटेलने अप्रतिम चेंडू टाकत मिलरला माघारी धाडले. मिलर ९ धावा करून बाद झाला.
https://platform.twitter.com/widgets.js4TH T20I. WICKET! 10.2: David Miller 9(7) b Harshal Patel, South Africa 59/4 https://t.co/bK9JmZ5oqf #indvsa @Paytm
— BCCI (@BCCI) June 17, 2022
भारताने दिलेले १७० धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकन संघाने १० षटकांमध्ये ५८ धावा केल्या. रॉसी व्हॅन डेर डुसेन आणि डेव्हिड मिलर मैदानावर उपस्थित आहेत.
हेनरिक क्लासेन युझवेंद्र चहलच्या जाळ्यात अडकला. तो अवघ्या ८ धावा करून बाद झाला. आफ्रिकेची अवस्था तीन बाद ४५ अशी आहे.
https://platform.twitter.com/widgets.js4TH T20I. WICKET! 8.2: Heinrich Klaasen 8(8) lbw Yuzvendra Chahal, South Africa 45/3 https://t.co/bK9JmZ5oqf #indvsa @Paytm
— BCCI (@BCCI) June 17, 2022
आवेश खानच्या गोलंदाजीवर ड्वेन प्रिटोरिअस शून्यावर बाद झाला. आफ्रिकेची अवस्था २७ वर दोन बाद अशी झाली आहे.
आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर धावचित झाला. त्याने १३ चेंडूत १४ धावा केल्या.
https://platform.twitter.com/widgets.js4TH T20I. WICKET! 4.5: Quinton De Kock 14(13) Run Out Harshal Patel, South Africa 24/1 https://t.co/bK9JmZ5oqf #indvsa @Paytm
— BCCI (@BCCI) June 17, 2022
दक्षिण आफ्रिकन कर्णधार टेम्बा बावुमा जखमी झाल्यामुळे तंबूत परत गेला आहे. त्याच्या जागी ड्वेन प्रिटोरिअस मैदानात उतरला आहे.
भारताने दिलेल्या १७० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आफ्रिकन सलामीवीर मैदानात उतरले आहेत. कर्णधार टेम्बा बावुमा आणि क्विटंन डी कॉकने डावाची सुरुवात केली.
स्फोटक भारतीय फलंदाज दिनेश कार्तिकने २६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमधील त्याचे हे पहिले अर्धशतक ठरले.
स्फोटक भारतीय फलंदाज हार्दिक पंड्याला लुंगी एनगिडीने बाद केले. पंड्याने ३१ चेंडूत झटपट ४६ धावा केल्या. चार धावांनी त्याचे अर्धशतक हुकले.
उपकर्णधार हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिक भारतीय डाव सावरण्याच्या प्रयत्नात आहेत. दोघांनी १६व्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले आहे.
https://platform.twitter.com/widgets.js4TH T20I. 15.3: Anrich Nortje to Dinesh Karthik 4 runs, India 104/4 https://t.co/bK9JmZ5oqf #indvsa @Paytm
— BCCI (@BCCI) June 17, 2022
केशव महाराजच्या चेंडूवर कर्णधार ऋषभ पंत बाद झाला आहे. पुन्हा एकदा फटकेबाजी करण्याचा नादात भारतीय कर्णधाराने आपले नियंत्रण गमावले. भारताची अवस्था चार बाद ८१ अशी झाली आहे.
दहा षटकांमध्ये भारतीय संघाने तीन बाद ५६ धावांपर्यंत मजल मारली आहे. कर्णधार ऋषभ पंत आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या डाव सावरण्याच्या प्रयत्नात आहेत.
ईशान किशनच्या रुपात भारतीय संघाला तीसरा झटका बसला आहे. ईशान २७ धावा करून एनरिक नॉर्कियाच्या गोलंदाजीवर बाद झाला.
https://platform.twitter.com/widgets.js4TH T20I. WICKET! 6.1: Ishan Kishan 27(26) ct Quinton De Kock b Anrich Nortje, India 40/3 https://t.co/bK9JmZ5oqf #indvsa @Paytm
— BCCI (@BCCI) June 17, 2022
पावरप्लेच्या सहा षटकांमध्ये भारतीय संघाने ४० धावा केल्या आहेत. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर झटपट बाद झाल्यामुळे कर्णधार ऋषभ पंत मैदानात उतरला आहे.
भारताचा स्फोटक फंलदाज श्रेयस अय्यर अवघ्या चार धावा करून बाद झाला. मार्को यान्सनच्या गोलंदाजीवर तो पायचित झाला. अय्यर बाद झाल्यानंतर कर्णधार ऋषभ पंत मैदानात आला आहे.
सलामीवीर ऋतुराज गायकवाड पाच धावा करून बाद झाला आहे. लुंगी एनगिडीने त्याला माघारी पाठवले. भारताची अवस्था एक बाद १३ अशी आहे.
https://platform.twitter.com/widgets.js4TH T20I. WICKET! 1.6: Ruturaj Gaikwad 5(7) ct Quinton De Kock b Lungisani Ngidi, India 13/1 https://t.co/bK9JmZ5oqf #indvsa @Paytm
— BCCI (@BCCI) June 17, 2022
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने सलग चारवेळा नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताचे सलामीवीर ईशान किशान आणि ऋतुराज गायकवाड डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.
भारतीय संघ : ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल.
दक्षिण आफ्रिका संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डीकॉक, ड्वेन प्रिटोरियस, रॉसी व्हेन डेर डुसेन, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, केशव महाराज, एनरिक नॉर्किया, मार्को यान्सन, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी.