India vs South Africa ICC Cricket World Cup 2023 Match Updates: कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विश्वचषक २०२३ चा ३७ वा सामना रंगणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असतील. आज त्यांचा वाढदिवसही आहे. विराट २५ वर्षांचा झाला आहे. सचिन तेंडुलकरच्या वनडेत ४९ शतकांच्या विक्रमापासून तो एक शतक दूर आहे. विराटने त्याच्या वाढदिवशी या विक्रमाशी बरोबरी केली तर चाहत्यांसाठी ती भेटवस्तूपेक्षा कमी नसेल. विराटच्या नावावर आतापर्यंत ४८ वनडे शतके आहेत.

विश्वचषकात विराट जबरदस्त फॉर्ममध्ये आहे –

या विश्वचषकात विराटचा विक्रमही उत्कृष्ट ठरला आहे. त्याने सात सामन्यांच्या सात डावात ८८.४० च्या सरासरीने ४४२ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. यापूर्वीच्या काही प्रसंगी तो शतक झळकावण्यास मुकला होता. मात्र, विराट या सामन्यात शतक झळकावून चाहत्यांना आनंदी होण्याची संधी देऊ इच्छितो. विराटने आतापर्यंत वनडेमधील २८८ सामन्यांच्या २७६ डावांमध्ये ५८.०५ च्या उत्कृष्ट सरासरीने १३,५२५ धावा केल्या आहेत. यामध्ये ४८ शतके आणि ७० अर्धशतके आहेत. १८३ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

Suryakumar Yadav won the hearts of fans video viral
Suryakumar Yadav : याला म्हणतात देशभक्ती… देशाचा अपमान होताना पाहून सूर्यकुमार यादवने केलं असं काही की, तुम्हीही कराल सलाम, पाहा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
anshul kamboj
१० पैकी १० विकेट्स! अंशुल कंबोजचा रणजी स्पर्धेत विक्रम
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय खेळपट्टीवर विराटचा विक्रम –

तिन्ही फॉरमॅटसह विराटने ईडन गार्डन्सवर १६ सामने खेळले आहेत. त्याने १९ डावात ४६.५८ च्या सरासरीने ७९२ धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारतीय खेळपट्ट्यांवर विराटचा विक्रमही उत्कृष्ट आहे. भारतातील या संघाविरुद्ध त्याने नऊ सामन्यांच्या आठ डावांत ४१.७५ च्या सरासरीने ३३४ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. अशा स्थितीत विराट आज शतक झळकावून चाहत्यांना पुन्हा एकदा आनंद साजरा करण्याची संधी देईल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचा – World Cup 2023: पाकिस्तानच्या विजयामुळे पुन्हा पॉइंट टेबल फिरला; भारताशी भिडण्यासाठी करावी लागेल आकडेमोड!

विराट वाढदिवसाच्या दिवशी शतक करू शकेल का?

विराटच्या यंदाच्या वनडेतील विक्रमाबद्दल बोलायचे झाले, तर त्याने २३ सामन्यांच्या २० डावांमध्ये ६५.८८ च्या सरासरीने १०५४ धावा केल्या आहेत. यामध्ये चार शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद १६६ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या होती. या विश्वचषकात आतापर्यंत विराटने ८५ धावा, नाबाद ५५, १६ धावा, नाबाद १०३, ९५ धावा, शून्य आणि ८८ धावा अशा खेळी केल्या आहेत. जर त्याने आज शतक केले तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या वाढदिवशी शतक ठोकणारा सातवा खेळाडू ठरेल. टॉम लॅथम, रॉस टेलर, सनथ जयसूर्या, मिचेल मार्श, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी यापूर्वी ही कामगिरी केली आहे.

वाढदिवशी वनडेत शतक झळकावणारे फलंदाज –

टॉम लॅथम -१४०* विरुद्ध नेदरलँड्स ०२/०४/२०२२
रॉस टेलर -१३१* विरुद्ध पाकिस्तान ०८/०३/२०१११
सनथ जयसूर्या -१३० विरुद्ध बांगलादेश ३०/०६/२००८
मिचेल मार्श -१२१ विरुद्ध पाकिस्तान २०/१०/२०२३
सचिन तेंडुलकर -१३४ विरुद्ध ऑस्ट्रेलिया २४/०४/१९९८
विनोद कांबळी -१००* विरुद्ध इंग्लंड १८/०१/१९९३