India vs South Africa 2nd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (१९ डिसेंबर) खेळवला जात आहे. गकबेराह येथील सेंट जॉर्ज पार्क येथे दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ ४६.२ षटकात धावांवर गारद झाला. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २१२ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. जर भारताने हा सामना जिंकला तर ही एकदिवसीय मालिका खिशात घालेल. तब्बल २०१८ नंतर ही एकदिवसीय मालिका भारत दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर जिंकेल.
टीम इंडिया पूर्ण ५० षटकेही खेळू शकली नाही
दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला २११ धावांत गुंडाळले. आवेश खानच्या रूपाने टीम इंडियाला १०वा धक्का बसला. ९ चेंडूंवर ९ धावा करून तो धावबाद झाला. भारत ४६.२ षटकात सर्वबाद २११ धावांवर आटोपला. भारताकडून साई सुदर्शनने सर्वाधिक ६२ धावा केल्या. कर्णधार के.एल. राहुलने ५६ धावांची खेळी केली. अर्शदीप सिंगने १८ धावा केल्या. रिंकू सिंगला पदार्पणाच्या वन डेत केवळ १७ धावा करता आल्या. संजू सॅमसन १० धावा करून बाद झाला तर तिलक वर्मा १० धावा करून बाद झाला. आवेश खान नऊ, अक्षर पटेल सात, ऋतुराज गायकवाड चार आणि कुलदीप यादव एक धावा करून बाद झाला. मुकेश कुमारने नाबाद चार धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गरने तीन विकेट्स घेतल्या. बुरेन हेंड्रिक्स आणि केशव महाराज यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. लिझाद विल्यमसन आणि एडन मार्कराम यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
रिंकू सिंग डेब्यू केले आहे
भारताचा डावखुरा फलंदाज रिंकू सिंगला पदार्पणाची संधी मिळाली आहे. नाणेफेकीपूर्वी कुलदीप यादवने त्याला वनडे कॅप दिली. त्याने याआधी टी-२० मध्ये पदार्पण केले आहे. कसोटी मालिकेच्या तयारीसाठी श्रेयस अय्यरने एकदिवसीय मालिकेतून माघार घेतली आहे. पहिल्या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर खेळताना त्याने शानदार अर्धशतक झळकावले. अशा परिस्थितीत त्याच्या जागी रजत किंवा रिंकूला संधी मिळू शकते, असे वाटत होते आणि रिंकूला संधी मिळाली. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेला एप्रिल २०२१ पासून सलग चौथी मायदेशातील मालिका गमावण्याचा धोका आहे.
दोन्ही संघांचे प्लेइंग–११
दक्षिण आफ्रिका: टोनी डी जोर्गी, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लिझाद विल्यम्स, बुरेन हेंड्रिक्स.
भारत: के.एल. राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार.