India vs South Africa 1st ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला सामना आज जोहान्सबर्गच्या न्यू वाँडरर्स स्टेडियमवर खेळला जात आहे. टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीपुढे आफ्रिकन फलंदाजांनी अक्षरशः गुडघे टेकले. भारतासमोर विजयासाठी केवळ ११७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नुकतीच झालेली तीन सामन्यांची टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत संपली. के.एल. राहुल एकदिवसीय संघाचा कर्णधार असून एडन मार्कराम दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व करत आहे. मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा तो निर्णय आफ्रिकन फलंदाजांनी सपशेल चुकीचा ठरवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, टीम इंडियाचा आघाडीचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने सुरुवातीला आफ्रिकन संघाला मोठे धक्के दिले. यजमान संघाचा निर्णय चुकीचा असल्याचे त्याने त्याच्या गोलंदाजीतून दाखवून दिले. त्याने पहिल्याच षटकात सलग दोन विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारतीय संघाला आफ्रिकन संघावर दबाव निर्माण करण्यात मदत झाली आणि दडपणाखाली संपूर्ण संघ २७.३ षटकात ११६ धावांमध्ये ढेपाळला. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंगने पाच विकेट्स घेतल्या. तर आवेश खानने चार विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवने नंद्रा बर्गरला क्लीन बॉलिंग देत आफ्रिकेचा डाव गुंडाळला.

तीन धावसंख्येवर दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्याच षटकात दोन मोठे धक्के बसले. या षटकातील चौथ्या चेंडूवर अर्शदीपने रीझा हेंड्रिक्सला त्रिफळाचीत केले. चेंडू त्याच्या बॅटच्या बाहेरील कडा घेऊन स्टंपवर आदळला. रिझाला खातेही उघडता आले नाही. यानंतर पुढच्याच चेंडूवर अर्शदीपने रॅसी-व्हॅन-डर डुसेनला पायचीत बाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. मात्र, अर्शदीपची हॅट्ट्रिकची संधी हुकली.

५२ धावांवर दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी अफलातून गोलंदाजी करताना प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या. अर्शदीपने दुसऱ्या षटकात सलग दोन चेंडूंवर रीझा हेंड्रिक्स आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले होते. यानंतर आठव्या षटकात पुन्हा अर्शदीपने टोनी डी जॉर्जीला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. यानंतर १०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अर्शदीपने हेनरिक क्लासेनला त्रिफळाचीत केले. ११व्या षटकात आवेश खानची हॅटट्रिक हुकली. त्याने पहिल्या दोन चेंडूंवर एडन मार्कराम आणि व्हियान मुल्डरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र, तिसऱ्या चेंडूवर अँडिले फेहलुकवायोने बचाव केल्याने त्याला विकेट मिळवता आली नाही. ११ षटकांनंतर दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ६ गड्यांच्या मोबदल्यात ५४ धावा झाल्या होत्या.

यानंतर दक्षिण आफ्रिका थोडीफार यातून स्वतः ला सावरू शकेल असे वाटत होते मात्र, तसे झाले नाही. दक्षिण आफ्रिकेला १३व्या षटकात ५८ धावांवर सातवा धक्का बसला. आवेश खानने डेव्हिड मिलरला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. मिलरला फक्त दोन धावा करता आल्या. मिलर बाद होताच केशव महाराजलाही फारसे काही करता आले नाही. ऋतुराज गायकवाडकरवी तो झेलबाद झाला, त्याने मिलर पेक्षा दोन धावा जास्त म्हणजे चार धावा करता आल्या. अर्शदीपला डावातील २६व्या षटकात पाचवे यश मिळाले. मैदानावर स्थिरावलेल्या अँडिले फेहलुकवायोला त्याने एलबीडब्ल्यू आऊट केले. ४९ चेंडूत ३३ धावा करून तो बाद झाला. तर, कुलदीपने शेवटची विकेट घेतली. आवेश पाच विकेट्स घेऊ शकला नाही.

रिंकूऐवजी सॅमसनला संधी देण्यात आली आहे

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताना मार्करामने सांगितले की, “नांद्रे बर्जर वन डेमध्ये पदार्पण करणार आहे.” त्याचबरोबर भारतीय कर्णधार राहुलनेही विश्वचषकापासून एकदिवसीय संघात बरेच बदल केले आहेत. साई सुदर्शनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आज पदार्पण केले. सुदर्शनने आयपीएलमध्ये खूप प्रभावित केले होते. तो ऋतुराजबरोबर सलामीला फलंदाजी करताना दिसणार आहे. रिंकू सिंगला वगळण्यात आले असून त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे.

हेही वाचा: WI vs ENG: रोमहर्षक सामन्यात इंग्लंडचा ऐतिहासिक विजय! हॅरी ब्रूकने आंद्रे रसेलच्या षटकात केली तुफान फलंदाजी

दोन्ही संघांचे प्लेइंग११

भारत: के.एल. राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, आवेश खान, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका: एडन मार्कराम (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, टोनी डी जोर्जी, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुकवायो, विआन मुल्डर, नांद्रे बर्गर, केशव महाराज, तबरेझ शम्सी.