IND vs SA India National Anthem Stopped Suddenly Technical Glitch : भारताने डर्बनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ६१ धावांनी पराभव करत चार सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करताना संजू सॅमसनच्या १०७ धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २० षटकांत आठ गडी गमावून २०२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला १७.५ षटकांत केवळ १४१ धावा करता आल्या. दरम्यान हा सामना सुरु होण्यापूर्वी एक विचित्र घटना घडली. वास्तविक, भारताचे राष्ट्रगीत सुरु होताच काही सेकंदात बंद झाले, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना डर्बन येथे खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंपरेनुसार दोन्ही संघांचे खेळाडू सामना सुरू होण्यापूर्वी मैदानात पोहोचले. प्रथम पाहुण्या संघाचे म्हणजेच भारताचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले. त्यानंतर असे काही घडले, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

भारताचे राष्ट्रगीत सुरु होताच काही सेकंदात बंद का झाले?

वास्तविक, भारताच्या राष्ट्रगीताची म्हणजेच जन गण मनाची धून काही सेकंदांसाठीच वाजवली गेली नंतर अचानक मैदानाची साउंड सिस्टीम बिघडली. काही सेकंद कोणालाच समजले नाही काय झाले! खेळाडू एकमेकांकडे बघू लागले. अचानक टीव्हीवर शांतता पसरली आणि मागे बसलेल्या प्रेक्षकांचा आवाज ऐकू येत होता, पण भारतीय संघाला आपल्या देशाची प्रतिष्ठा आणि राष्ट्रगीताचं महत्त्व चांगलंच माहीत आहे. त्यामुळे साउंड सिस्टीम बिघडल्याने राष्ट्रगीत बंद झाले असतानाही मॅन इन ब्लूजने पूर्ण आदराने राष्ट्रगीत गायले. त्यानंतर पुन्हा म्युझिक साउंड सिस्टीम सुरू झाली आणि पुन्हा एकदा स्टेडियममध्ये जन गण मनाचा सूर घुमू लागला, खेळाडूंनी पुन्हा एकदा आदराने ते पूर्ण केले.

हेही वाचा – कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: किरण जॉर्ज उपांत्य फेरीत

नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. अभिषेक शर्माला मोठी खेळी खेळता आली नाही, पण संजू सॅमसनने सलग दुसऱ्या टी-२० सामन्यात शतक झळकावून इतिहास घडवला आहे. त्याने ५० चेंडूत १०७ धावा करताना ७ चौकार आणि १० षटकार मारले. तिलक वर्माने १८ चेंडूत ३३ धावांची तुफानी खेळी करत भारताची धावसंख्या २०० च्या पुढे नेण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. मात्र, भारतीय संघाने शेवटच्या पाच षटकांमध्ये चांगली फलंदाजी केली नाही, परंतु गोलंदाजांनी त्याची भरपाई केली.

हेही वाचा – पाकिस्तानात खेळण्यास नकारच! दुबईत सामने आयोजित करण्याची ‘बीसीसीआय’ची मागणी

भारतीय गोलंदाजांनी केला कहर –

दक्षिण आफ्रिका सुरुवातीपासूनच मोठी भागीदारी रचण्यासाठी धडपडत असल्याचे दिसत होते. यजमान संघाच्या ४४ धावांपर्यंत ३ विकेट्स पडल्या होत्या. त्यानंतर धावसंख्या ९३ धावांपर्यंत पोहोचली तोपर्यंत आफ्रिकेचे ७ फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. परिस्थिती अशी होती की दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या १० षटकांत १२५ धावा करायच्या होत्या, मात्र मधल्या षटकांमध्ये वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांच्या घातक गोलंदाजीमुळे टीम इंडियाला सामना जिंकण्यात यश आले. या दोघांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या, त्याशिवाय आवेश खाननेही दोन आणि अर्शदीप सिंगने एक विकेट घेतली.

Story img Loader