KL Rahul, India vs South Africa 1st Test Match: तो आला, त्याने पाहिलं अन् शतक ठोकलं असच के.एल. राहुलचे वर्णन करता येईल. सेंच्युरियनमध्ये दुसऱ्यांदा शतक झळकावत लोकेश राहुलने एक नवा इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. मधल्या फळीत फलंदाजी करत एक विकेटकीपर म्हणून शतक झळकावणारा धोनी, दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंतनंतरचा दूसरा खेळाडू बनला आहे. २०१४, २०२१-२० आणि आता २०२३-२४ बॉक्सिंग डे कसोटीत शतक कारणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. के.एल. राहुलने १३३ चेंडूत आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. आतापर्यंत त्याने आपल्या खेळीत १४ चौकार आणि चार षटकार मारले आहेत. राहुलने जेराल्ड कोएत्झीच्या चेंडूवर षटकार ठोकत शतक पूर्ण केले.

के.एल. राहुलचे शतक

के.एल. राहुलने १३३ चेंडूत आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. आतापर्यंत त्याने आपल्या खेळीत १४ चौकार आणि चार षटकार मारले आहेत. राहुलने जेराल्ड कोएत्झीच्या चेंडूवर षटकार ठोकत शतक पूर्ण केले. वास्तविक, भारताने आज आठ विकेट्सवर २०८ धावांवर खेळण्यास सुरुवात केली. सिराजने काही चांगले शॉट्स मारले, मात्र ६६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर सिराज २२चेंडूत पाच धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताने नऊ विकेट गमावल्या होत्या आणि प्रसिध कृष्णा फलंदाजीला आला होता. कोएत्झीच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर प्रसिधने धाव घेतली. राहुलने चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो फटकावता आला नाही. राहुलने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत शतक पूर्ण केले. सेंच्युरियनमधील राहुलचे हे सलग दुसरे कसोटी शतक आहे. २०२१मध्ये बॉक्सिंग डे कसोटीत राहुलने २४८ चेंडूत १२२ धावांची नाबाद खेळी खेळली होती. दक्षिण आफ्रिकेतील राहुलचे हे दुसरे कसोटी शतक ठरले.

India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
KL Rahul Injured in Intra Squad Match Simulation Session Perth Walks Off Field for Scanning Ahead Border Gavaskar Trophy IND vs AUS
IND vs AUS: भारताला पर्थ कसोटीपूर्वी मोठा धक्का, केएल राहुलला सराव सामन्यात दुखापत, सोडावं लागलं मैदान!
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव
Suryakumar Yadav made big mistake in India lost the second T20I against South Africa
Suryakumar Yadav : कर्णधार सूर्यकुमार यादवची ‘ती’ चूक टीम इंडियाला पडली महागात, यजमानांनी भारताच्या तोंडचा घास हिरावला
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
Suryakumar Yadav and Sanju Samson fight with Marco Jansen video viral in IND vs SA 1st T20I
Suryakumar Yadav : संजू सॅमसनला नडणाऱ्या मार्को यान्सनशी भिडला सूर्या, लाइव्ह सामन्यातील वादावादीचा VIDEO व्हायरल

भारतीय संघ २४५ धावांवर ऑलआऊट झाला

नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर भारतीय संघाचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी ६७.४ षटकांत २४५ धावांवर आटोपला. आज भारताने आठ विकेट्सवर २०८ धावांवर खेळण्यास सुरुवात केली आणि संघाला ३७ धावांची भर घालता आली. आजचा पहिला धक्का मोहम्मद सिराजच्या (२२ चेंडूत ५ धावा) गेराल्ड कोएत्झीने पॅव्हेलियनमध्ये पाठवला. त्याचवेळी नांद्रे बर्जरने राहुलला क्लीन बॉलिंग देत भारताचा डाव संपवला. आज टीम इंडिया मैदानात आली तेव्हा राहुल ७० धावा करून खेळत होता. यानंतर त्याने कोएत्झीच्या चेंडूवर षटकार ठोकून आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक पूर्ण केले. १३७ चेंडूंत १४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०१ धावा करून तो बाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या आहेत. नांद्रे बर्जरने तीन विकेट्स घेत त्याला मदत केली. मार्को जॅनसेन आणि जेराल्ड कोएत्झी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

पहिल्या दिवशी काय झाले?

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात काही खास नव्हती आणि कर्णधार रोहित पाच धावा करून रबाडाचा पहिला बळी ठरला. यानंतर यशस्वी जैस्वाल १७ धावा करून निघून गेला आणि शुबमन गिल दोन धावा करून निघून गेला. २४ धावांत तीन गडी गमावल्याने भारतीय संघ अडचणीत आला होता. अशा स्थितीत श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढले.कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसाचा व्यत्यय आला आणि केवळ 59 षटके खेळता आली.

हेही वाचा: IND vs SA 1st Test: खराब फलंदाजीनंतर मांजरेकरांनी शुबमन गिलवर केली टीका; म्हणाले, “संघातील प्रतिस्पर्धीबरोबर…”

विराट ३८ धावा करून बाद झाला तर श्रेयस ३१ धावा करून बाद झाला. रविचंद्रन अश्विनने आठ आणि शार्दुल ठाकूरने २४ धावांचे योगदान दिले. जसप्रीत बुमराहही एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, लोकेश राहुल एका बाजूला तंबू ठोकून उभा राहिला. त्याने शतक झळकावून भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. आता भारतीय गोलंदाज दक्षिण आफ्रिकेला लवकर बाद करतात का, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.