भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानचा दुसरा टी ट्वेंटी सामना कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा चार गडी राखून पराभव केला. त्यामुळे, पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये आफ्रिकेला २-० अशी आघाडी मिळाली आहे. कटकमध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने एक विशेष कामगिरी केली. टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये आफ्रिकन संघासाठी सर्वात वेगवान ५० बळी टिपण्याची कामगिरी त्याने केली आहे.

नाणेफेक जिंकून आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने भारताला फलंदाजीसाठी निमंत्रित केले. ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड सलामी देण्यासाठी मैदानात उतरले होते. कगिसो रबाडाने पहिल्याच षटकात ऋतुराज गायकवाडला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. गायकवाडला बाद केल्यानंतर, तो टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये ५० बळी घेणारा चौथा आफ्रिकन गोलंदाज ठरला. याबरोबरच टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान ५० बळी पूर्ण करणारा तो दुसरा वेगवान गोलंदाज ठरला.

Nitish Reddy reveals chat with coach Gautam Gambhir before IND vs AUS Perth test
Nitish Reddy : ‘जसं तुम्ही देशासाठी गोळी झेलत आहात…’, असं का म्हणाला गौतम गंभीर? पदार्पणवीर नितीश रेड्डीने केला खुलासा
IPL 2025 Auction Time Changes Due to Broadcasters Request To Avoid Overlap With IND vs AUS Perth Test
IPL Auction 2025: IPL महालिलावाची अचानक बदलली वेळ,…
d gukesh chess championship
गुकेशपर्वाची नांदी…?
Rishabh Pant Becomes Only Third Indian Batter Who Completes 2000 Runs in WTC History After Rohit Sharma Virat kohli
IND vs AUS: ऋषभ पंतची नव्या विक्रमाला गवसणी, रोहित-विराटनंतर कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा तिसरा फलंदाज
IND vs AUS Australia embarrassing record of losing 5 wickets for less than 40 runs in a home Test 2nd Time after since 1980
IND vs AUS : भारतीय गोलंदाजांपुढे ऑस्ट्रेलियाची उडाली भंबेरी! ४४ वर्षांत कांगारु संघावर दुसऱ्यांदा ओढवली ‘ही’ नामुष्की
Mohammed Siraj and Marnus Labuschagne Fight Virat Kohli Angry and Puts off Bails in IND vs AUS Perth Test Watch Video
IND vs AUS: सिराज आणि लबुशेन भर मैदानात एकमेकांशी भिडले, लबुशेनची कृती पाहून विराटही संतापला अन्… VIDEO व्हायरल
Jasprit Bumrah Becomes 1st Indian and 2nd Bowler in World to dismiss Steve smith on Golden Duck in Test IND vs AUS
IND vs AUS: जसप्रीत बुमराहचा पर्थ कसोटीत दुर्मिळ विक्रम, कसोटीत ‘ही’ कामगिरी करणारा जगातील दुसरा तर भारताचा पहिला गोलंदाज
Harshit Rana 1st Test Wicket Travis Head Video Viral
Harshit Rana : हर्षित राणाची पदार्पणातच कमाल! भारतासाठी सतत कर्दनकाळ ठरणाऱ्या ट्रॅव्हिस हेडचा उडवला त्रिफळा
KL Rahul 3000 runs Complete in Test during IND vs AUS 1st Test at Perth
KL Rahul : केएल राहुलने २६ धावा करूनही केला मोठा पराक्रम, कसोटीत पार केला खास टप्पा

रबाडाने ४२ सामन्यात ५० बळी घेतले. डावखुरा फिरकी गोलंदाज इम्रान ताहिर या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने ३१ सामन्यांमध्येच ही कामगिरी केली होती.

इमरान ताहिर, डेल स्टेन आणि तबरेझ शम्सी हे दक्षिण आफ्रिकेच्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ५० बळी घेणाऱ्या गोलंदाजांपैकी आहेत. आता या क्लबमध्ये कगिसो रबाडाचाही समावेश झाला आहे. ताहिरने ६१, स्टेनने ६४ आणि शम्सीने ५७ बळी घेतलेले आहेत. या तिघांपैकी आता फक्त शम्सी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो आहे.