भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात केपटाऊन येथे तिसरी कसोटी खेळवण्यात येत आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस असून आफ्रिका संघाने खूप चांगली सुरुवात केली. दुसऱ्या दिवसअखेर नाबाद असलेली विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराची जोडी फोडण्यात त्यांना यश आले. आफ्रिकेचा तेजतर्रार गोलंदाज मार्को जानसेनने पुजाराला झेलबाद केले. कीगन पीटरसनने पुजाराचा अप्रतिम झेल टिपत सर्वांची वाहवा मिळाली. त्याचा हा झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
डावखुरा वेगवान जानसेनने लेग स्टम्पच्या दिशेने चेंडू टाकला. पण उंचीमुळे जानसेनचा चेंडू नेहमीच चांगली उसळी घेतो. इथेही तेच झाले. फलंदाजाच्या अपेक्षेपेक्षा जास्त चेंडुला उसळी मिळाली. पुजारा या चेंडूला बचाव करायला गेला. पण चेंडूची उसळी जास्त असल्याने पुजाराला त्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. आणि त्याने चेंडू दूर ढकलण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा – IPL 2022 : BCCIचा प्लॅन B तयार..! यूएई नव्हे, तर ‘या’ देशात खेळवली जाऊ शकते लीग
लेग स्लिपवर उभा असलेल्या पीटरसनने उजवीकडे उडी मारत हा चेंडू अप्रतिमरित्या टिपला. त्याने एकहाती झेल घेतला. कॉमेंट्री करणारे सुनील गावसकरही पीटरसनच्या झेलचे चाहते झाले. ते म्हणाले, ”कधीकधी आमच्यासारख्या मोठ्यांची आज्ञा पाळण्यात फायदा होतो.”
चेतेश्वर पुजाराला दुसऱ्या डावात ९ धावांची भर घालता आली नाही. पुजाराने पहिल्या डावात ४३ धावांची उपयुक्त खेळी खेळली.