KL Rahul, India vs South Africa: एकदिवसीय विश्वचषकातील पराभवानंतर टीम इंडियाची नजर आता टी-२० विश्वचषकावर आहे. त्यासाठी व्यवस्थापनानेही तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर खेळाडूही तयारीला लागले आहेत. विश्वचषकात विकेटकीपिंग आणि फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करणारा के.एल. राहुल आता टी-२०साठी नव्याने तयारी करत आहे. राहुलने यासाठी त्याची आयपीएल फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्सच्या व्यवस्थापनाशीही चर्चा केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुलला आता फक्त एकदिवसीयच नाही तर तिन्ही फॉरमॅटमध्ये मधल्या फळीत फलंदाजी करायची आहे. त्याची सुरुवात दक्षिण आफ्रिकेतील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेने होऊ शकते. त्याने याआधीही मधल्या फळीत फलंदाजी केली आहे, पण तो नियमितपणे फलंदाजी करण्याचा विचार करत आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तो कर्णधार असेल. या फॉरमॅटमध्ये तो आधीच मधल्या फळीत खेळत आहे. जर या प्रयोगात तो यशस्वी ठरला तर संघाला तिन्ही फॉरमॅटमध्ये यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून पर्याय मिळेल.

shivraj singh chauhan Maha Vikas Aghadi and Rahul Gandhi mislead the public with false promises and no development vision
शिवराजसिंह चौहान म्हणतात राहुल गांधींकड विकासाचे कुठलेही व्हीजन नाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Tiroda Constituency, Vijay Rahangdale,
तिरोड्यात पुन्हा कमळ फुलणार, की तुतारी वाजणार?
Prithviraj Chavan campaign in Karad, Prithviraj Chavan,
सत्ता आल्यावर कराड जिल्हा करणार – पृथ्वीराज चव्हाण
वक्फ मंडळ कायदा नरेंद्र मोदीच बदलणार; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा विश्वास; राहुल गांधींवर टीका
Mumbai traffic routes marathi news
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी वाहतुकीत बदल
nagpur Congress party leader is campaigning for Congress rebel Rajendra Mulak
रामटेकमध्ये काँग्रेसचा ‘मविआ’विरोधातच प्रचार? शिवसेनेचा आरोप

इशान किशनच्या जागी राहुल कसोटीत खेळू शकतो

तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये तो केवळ यष्टीरक्षणच करणार नसून, कसोटी सामन्यांमध्येही तीच जबाबदारी सांभाळेल, अशी माहिती दिली जात आहे. इशान किशन हा देखील १६ सदस्यीय संघाचा एक भाग आहे, परंतु इशानच्या तुलनेत राहुलला यष्टिरक्षणासाठी पसंती मिळेल, असे मानले जात आहे. राहुलचे मधल्या फळीतील फलंदाजात होणारे रूपांतर येत्या काही महिन्यांत जवळून पाहण्यासारखे असेल, विशेषत: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी, इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी आणि आयपीएलच्या आगामी हंगामात. नवी दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत त्याने मधल्या फळीत डावाची सुरुवात केली होती.

हेही वाचा: WI vs ENG: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आंद्रे रसेलचे दमदार पुनरागमन! इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तीन विकेट्स घेत केला विक्रम

लखनऊ सुपर जायंट्ससाठी मधल्या फळीत फलंदाजी करू शकतो

राहुलने तिन्ही फॉरमॅटमध्ये दीर्घकाळ सलामी दिली आहे. आयपीएलमध्येही तो डावाची सुरुवात करतो. आता त्याच्याकडून लखनऊ सुपर जायंट्सच्या मधल्या फळीत फलंदाजी अपेक्षित आहे. त्याचा परिणाम आयपीएल लिलावादरम्यान दिसून येईल. फ्रँचायझी भारतीय सलामीवीर खरेदी करू इच्छित आहे.

राहुलने विश्वचषकात चमकदार कामगिरी केली होती

राहुलने आपल्या नऊ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतासाठी ४४ कसोटी, २३ एकदिवसीय आणि ५५ टी-२० सामने खेळले आहेत. राहुल या बदलाबाबत गंभीर आहे आणि फक्त मधल्या फळीतील फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याचे त्याचे ध्येय आहे. एकदिवसीय फॉरमॅटमध्ये त्याच्या अलीकडील यशामुळे त्याला प्रोत्साहन मिळाले आहे. विश्वचषकात त्याने १० सामन्यांमध्ये ७५ पेक्षा जास्त सरासरीने ४५२ धावा केल्या.

हेही वाचा: AUS vs PAK: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानची प्लेइंग-११ जाहीर, ‘या’ दोन खेळाडूंना संधी

रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केली

लोकेश राहुलने केवळ कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह संघ व्यवस्थापनाशीच नाही तर मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्याशीही चर्चा केली आहे. त्याचे पहिले उद्दिष्ट टी-२० आंतरराष्ट्रीयसह सर्व फॉरमॅटमध्ये मधल्या फळीतील स्थान सुरक्षित करणे हे आहे. आगामी टी-२० विश्वचषकासाठी संघात स्थान पक्के करण्यासाठी राहुलला हे करायचे आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघात क्विंटन डी कॉक, काइल मेयर्स आणि नवीन खेळाडू देवदत्त पडिक्कल हे सलामीचे पर्याय आहेत.