Virat Kohli equals Sachin Tendulkar’s record with 49th ODI century against South Africa: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेतील ३७व्या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. दोन्ही संघातील हा सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक प्रथम फलंदाजी निर्णय घेतला होता. विराट कोहलीने या सामन्यात आपले ४९ वनडे शतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबर केली. विराटने हे शतक ११९ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने पूर्ण केले. त्याचबरोबर भारतीय संघाने ५० षटकांत ५ बाद ३२६ धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेसमोर ३२७ धावांचे लक्ष्य ठेवले.
विराट कोहलीने ११९ चेंडूत शतक झळकावले. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील ४९ वे शतक होते. या बाबतीत त्याने महान फलंदाज आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली. सचिनने वनडेमध्ये ४९ शतके झळकावली आहेत. सचिनने ४५२ एकदिवसीय डावात ही कामगिरी केली होती, तर विराट कोहलीने २७७ व्या एकदिवसीय डावात ४९ शतके झळकावली आहेत. यात विशेष म्हणजे आज वाढदिवसाच्या दिवशी त्याने शतक झळकावून विक्रमाची बरोबरी केली. या विश्वचषकातील त्याचे हे दुसरे शतक ठरले.
वाढदिवशी वनडेत शतक झळकावणारा विराट सातवा फलंदाज ठरला –
या विश्वचषकात आतापर्यंत विराटने नाबाद १०१, ८५ धावा, नाबाद ५५, १६ धावा, नाबाद १०३, ९५ धावा, शून्य आणि ८८ धावा अशा खेळी केल्या आहेत. आज शतक झळकावत विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या वाढदिवशी शतक ठोकणारा सातवा खेळाडू ठरला आहे. टॉम लॅथम, रॉस टेलर, सनथ जयसूर्या, मिचेल मार्श, सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी यापूर्वी ही कामगिरी केली आहे.
वाढदिवशी वनडेत शतक झळकावणारे फलंदाज –
टॉम लॅथम -१४०* विरुद्ध नेदरलँड्स ०२/०४/२०२२
रॉस टेलर -१३१* विरुद्ध पाकिस्तान ०८/०३/२०१११
सनथ जयसूर्या -१३० विरुद्ध बांगलादेश ३०/०६/२००८
मिचेल मार्श -१२१ विरुद्ध पाकिस्तान २०/१०/२०२३
सचिन तेंडुलकर -१३४ विरुद्ध ऑस्ट्रेलिया २४/०४/१९९८
विनोद कांबळी -१००* विरुद्ध इंग्लंड १८/०१/१९९३
विराट कोहली – १०१* विरुद्ध दक्षिण आफ्रिका ०५/११/ २०२३
वनडेत सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज –
४९ विराट कोहली (२७७ डाव)
४९ सचिन तेंडुलकर (४५२ डाव)
३१ रोहित शर्मा (२५१ डाव)
३० रिकी पाँटिंग (३६५ डाव)
२८ सनथ जयसूर्या (४३३ डाव)