India vs South Africa, World Cup: येथे ५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघ शुक्रवारी संध्याकाळी येथे पोहोचला. मात्र, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि सपोर्ट स्टाफने खेळपट्टीची पाहणी करण्यासाठी थेट ईडन गार्डन्स गाठले आणि खेळपट्टीबाबत समाधान व्यक्त केले. श्रीलंकेचा ३०२ धावांनी पराभव केल्यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ शुक्रवारी संध्याकाळी मुंबईहून येथे पोहोचला. संघातील सर्व खेळाडू विमानतळावरून थेट आयटीसी सोनार हॉटेलमध्ये पोहोचले जेथे त्यांची एक झलक पाहण्यासाठी अनेक लोक हॉटेलबाहेर उपस्थित होते. शनिवारी भारतीय संघाने कसून सराव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

द्रविड जवळपास २० मिनिटे मैदानावर राहिला

या विश्वचषकात द्रविड अनेकदा मैदानात जाऊन खेळपट्टीची पाहणी करत असल्याचे दिसून आले आहे. येत्या दोन दिवसांत अवकाळी पावसाच्या अंदाजामुळे खेळपट्टी झाकून ठेवण्यात आली आहे. सायंकाळच्या सुमारासही हलक्या स्वरूपाचा रिमझिम पाऊस झाला. द्रविड सुमारे २० मिनिटे स्टेडियममध्ये थांबला आणि त्याच्याबरोबर बीसीसीआयचे स्टेडियम आणि खेळपट्टी समितीचे प्रमुख आशिष भौमिक आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचे स्थानिक क्युरेटर सुजन मुखर्जी उपस्थित होते.

हेही वाचा: NZ vs PAK: रचिन रवींद्रने रचला इतिहास! बंगळुरूमध्ये शतक ठोकत सचिन तेंडुलकरला टाकले मागे

रोहित आणि द्रविड या महत्त्वाच्या सल्ल्याचे पालन करतील

भारताने प्रथम फलंदाजी केल्यास या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या होऊ शकते, असा क्रिकेट क्लब ऑफ बंगाल (CAB) मधील अधिकाऱ्यांचा विश्वास आहे. हाच सल्ला त्यांनी द्रविड आणि संघाला दिला आहे. मुखर्जी नंतर म्हणाले, “द्रविड खेळपट्टीवर समाधानी वाटत होता. आम्ही चांगली खेळपट्टी बनवली आहे ज्यामुळे फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही मदत होईल. इथे चांगले क्रिकेट पाहायला मिळेल.” आतापर्यंतच्या दोन्ही विश्वचषक सामन्यांमध्ये ईडन गार्डन्सवर मोठी धावसंख्या उभारण्यात संघांना अपयश आलेले आहे, परंतु सर्वसाधारणपणे ही खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल असते ज्यावर वेगवान गोलंदाजांनाही मदत मिळते.

भारतीय संघ विश्वचषकातील आठव्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. स्पर्धेतील 37 वा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. टीम इंडियाची नजर सलग आठव्या विजयावर असेल. या विश्वचषकात तिने एकही सामना गमावलेला नाही. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने दमदार कामगिरी केली आहे. त्याने सातपैकी सहा सामने जिंकले आहेत. त्यांचा एकमेव पराभव नेदरलँडविरुद्ध झाला. त्याची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही अत्यंत धोकादायक आहे. गेल्या चार सामन्यात त्याने विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत बलाढ्य आफ्रिकन संघासमोर भारतीय खेळाडूंची खरी कसोटी असेल.

भारतीय संघ सात सामन्यांत सात विजयांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. त्यांच्या खात्यात १४ गुण आहेत. त्याचबरोबर सात सामन्यांत सहा विजयांसह दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. त्याचे १२ गुण आहेत. कोलकात्यातील सामना जिंकणारा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर असेल. भारताने जिंकल्यास त्याचे १६ गुण होतील. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवल्यास त्याचे १४ गुण होतील. त्यांचा नेट रनरेट (+२.२९०) भारताच्या नेट रनरेटपेक्षा (+२.१०२) चांगला आहे.

हेही वाचा: AUS vs ENG: मार्नस लाबुशेनचे शानदार अर्धशतक! ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर विजयासाठी ठेवले २८७ धावांचे आव्हान

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हेड टू हेड

वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये पाच सामने झाले आहेत. आफ्रिकन संघाला तीन विजय मिळाले आहेत. त्यांनी १९९२, १९९९ आणि २०११ मध्ये विजय मिळवला आहे. दुसरीकडे भारताने बाजी मारली आहे. टीम इंडियाने २०१५ आणि २०१९ मध्ये त्याचा पराभव केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील एकूण विक्रमाबद्दल बोलायचे तर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ९० सामने झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेने ५० जिंकले आहेत. भारताने ३७ सामने जिंकले आहेत. तीन सामन्यांत निकाल लागला नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa rahul dravid happy with eden gardens pitch cab officials advise indian coach find out avw
Show comments