IND vs SA 2nd T20 Weather Forecast: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. पहिल्या टी-२० सामन्यात एकही चेंडू टाकला गेला नाही. या मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच १२ डिसेंबर रोजी होणार आहे. पोर्ट एलिझाबेथ येथील सेंट जॉर्ज पार्क येथे दोन्ही संघ आमनेसामने येतील. पण दुसऱ्या सामन्यातही चाहत्यांची निराशा होईल का? पोर्ट एलिझाबेथमध्येही पाऊस खलनायक बनेल का? जाणून घेऊ या.

सामन्याच्या दिवशी पोर्ट एलिझाबेथमध्ये पाऊस पडेल का?

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार चाहत्यांसाठी कोणतीही चांगली बातमी नाही. वास्तविक, डरबन टी-२० प्रमाणेच पोर्ट एलिझाबेथमध्येही पाऊस खलनायक ठरू शकतो. म्हणजेच पावसामुळे दुसरा सामना देखील रद्द होऊ शकतो. दक्षिण आफ्रिकेच्या प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजता पावसाची शक्यता २० टक्के वर्तवण्यात आली आहे. याशिवाय आर्द्रता ७३.५ टक्के असणार आहे. तापमान २४ अंश सेल्सिअस ते १७ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. तसेच, आकाशात दाट काळे ढग असतील. त्याचवेळी हा सामना स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजता सुरू होईल. पण चांगली बातमी अशी आहे की सामन्याच्या मध्यावर दव पडण्याची अजिबात शक्यता नाही.

हेही वाचा: U-19 World Cup: पुन्हा एकदा रंगणार भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला, अंडर-१९ विश्वचषकाचे वेळपत्रक जाहीर

सेंट जॉर्ज पार्क क्रिकेट स्टेडियमवर तीन टी-२० सामने खेळले गेले आहेत

सेंट जॉर्ज पार्क क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी सुरुवातीला फलंदाजांना अनुकूल असते पण, जसजसा खेळ पुढे जाईल तसतशी ती फिरकी आणि वेगवान गोलंदाजांना अनुकूल होईल. या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होऊ शकतो. येथे पाठलाग करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या ९९ धावांची आहे. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ येथे प्रथम फलंदाजी करू शकतो.

सेंट जॉर्ज पार्क क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी २ सामने यजमान दक्षिण आफ्रिकेने जिंकले आहेत तर एक सामना पाहुण्या संघाने जिंकला आहे. एक सामना अनिर्णित राहिला. या खेळपट्टीवर सर्वाधिक १७९ धावा दक्षिण आफ्रिकेने २०१२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध केल्या होत्या. येथे सर्वात कमी धावसंख्या १४६ धावा आहे, जी २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केली होती. दोन्ही संघ आतापर्यंत २४ वेळा टी-२० मध्ये आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये भारताने १३ सामने जिंकले आहेत तर दक्षिण आफ्रिकेने १० सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला.

हेही वाचा: IND vs ENG: भारताविरुद्धच्या पाच कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर, तीन अनकॅप्ड खेळाडूंचा समावेश; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीची मदत मिळेल

आजच्या सामन्यात आकाश ढगाळ राहणार असल्याने वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीची मदत मिळेल, असे मानले जात आहे. पण या खेळपट्टीवर फिरकीपटूला फारशी मदत मिळण्याची शक्यता नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना पोर्ट एलिझाबेथ येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८.३० वाजता सुरू होईल. यानंतर मालिकेतील तिसरा सामना जोहान्सबर्ग येथे १४ डिसेंबर रोजी खेळवला जाईल.

Story img Loader