India vs South Africa 2nd Test Match: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीही आफ्रिकेची अवस्था वाईट झाली आहे. जसप्रीत बुमराहने त्याच्या पहिल्याच षटकात विकेट घेऊन यजमानांना बॅकफूटवर फेकले. त्यानंतर आणखी दोन धक्के देत त्याने डावात पाच विकेट्स पूर्ण करताना अनेक विक्रम नावावर केले. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या स्टार सलामीवीर फलंदाज एडन मार्करमने शानदार शतक झळकावले. त्याच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचे ९८ धावांचे आघाडी कमी करत ७९ धावांचे माफक लक्ष्य विजयासाठी ठेवले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव

दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या दिवसाच्या ६२/३ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यासाठी दुसऱ्या डावात उतरला. दुसऱ्या डावात ते बुमराहच्या घातक गोलंदाजीपुढे १७६ धावांत सर्वबाद झाली. पहिल्या डावात त्याने ५५ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारत १५३ धावांवर ऑलआऊट झाला. अशा प्रकारे टीम इंडियाला विजयासाठी ७९ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. जसप्रीत बुमराहने लुंगी एनगिडीला यशस्वी जैस्वालकडे झेलबाद करून दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव गुंडाळला. एनगिडीने १० चेंडूत ८ धावा केल्या. नांद्रे बर्गरने २० चेंडूत ६ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात १७३ धावांत गारद झाला. त्याला ७८ धावांची आघाडी मिळाली. त्यामुळे भारताला विजयासाठी ७९ धावांची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ५५ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारत १५३ धावांवर ऑलआऊट झाला.

आफ्रिकेच्या ठराविक अंतराने विकेट्स पडत राहिल्या, पण एडन मार्करामने एक बाजू सांभाळून धरली. कठीण परिस्थितीत त्याने शानदार शतक झळकावले आणि संघाला १५० धावांच्या पुढे नेले. मार्करामने १०३ चेंडूत १०६ धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर तीनच खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला. कर्णधार डीन एल्गरने कारकिर्दीतील शेवटच्या डावात १२ धावा केल्या. डेव्हिड बेडिंगहॅम आणि मार्को यान्सन यांनी प्रत्येकी ११ धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराहने सहा विकेट्स घेतल्या. मुकेश कुमार यांना दोन गडी बाद करण्यात यश मिळाले. प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

भारताचा पहिला डाव १५३ धावांत आटोपला

भारताची धावसंख्या जेव्हा १५३/४ होती तेव्हा विराट कोहली आणि के.एल. राहुल खेळपट्टीवर होते. कोहली ४६ आणि राहुल ८ धावांवर खेळत होता. राहुलला लुंगी एनगिडीने यष्टिरक्षक काइल वेरेयनच्या हाती झेलबाद केले. यानंतर विकेट्स पडण्यास सुरुवात झाली. त्याच्यानंतर एनगिडीने रवींद्र जडेजा (०) आणि जसप्रीत बुमराह (०) यांना बाद केले. एका बाजूने टीम इंडियाचा किल्ला लढवत असणारा विराट (४६ धावा) रबाडाच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये एडन मार्करामकरवी झेलबाद झाला. मग मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा हे दोघे तळाचे फलंदाज खाते न उघडताच बाद झाले. त्यात सिराज हा त्याच्या चुकीमुळे धावबाद झाला.

दक्षिण आफ्रिकेचा डाव ५५ धावांवर संपला

दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर आटोपला. पहिल्या सामन्यात सामान्य दिसणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली. मोहम्मद सिराजने सर्वाधिक सहा विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. काइल व्हर्नने १५ आणि डेव्हिड बेडिंगहॅमने १२ धावांचे योगदान दिले. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. एडन मार्कराम (२४ धावा), डीन एल्गर (१७ धावा), टोनी डी जॉर्जी (१२ धावा), ट्रिस्टन स्टब्स (१२ धावा), मार्को जॅनसेन (० धावा), केशव महाराज (१ धावा), कागिसो रबाडा (१ धावा), नांद्रे बर्जर बाद (४ धावा).

हेही वाचा: AUS vs PAK 3rd Test: सिडनी कसोटीत पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ११६/२

दोन्ही संघांची प्लेइंग११

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका: डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी जिओर्गी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेयन (यष्टीरक्षक), मार्को यान्सन, केशव महाराज, कागिसो रबाडा, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa south africa set a target of india 79 runs in the second test bumrah took six wickets in the second innings avw