IND vs SA Man ran away with the ball video viral : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शुक्रवारी डरबनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात असे काही पाहायला मिळाले ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या लाइव्ह मॅचदरम्यान जेव्हा फलंदाजाने मैदानाबाहेर षटकार मारला, तेव्हा मैदानाबाहेर उपस्थित असलेला एक व्यक्ती चेंडू घेऊन पळून गेला. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

षटकार मारल्यानंतर चेंडू गेला मैदानाबाहेर –

खरे तर, भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २०३ धावांचे लक्ष्य दिले होते, तेव्हा या धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या रायन रिकेल्टनने हार्दिक पांड्याच्या षटकात उत्तुंग षटकार ठोकला आणि चेंडू स्टेडियमच्या बाहेर गेला. जेव्हा चेंडू मैदानाबाहेर गेला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने तो उचलला आणि खिशात घालून पळून गेला. यादरम्यान सुरक्षा कर्मचारीही त्याच्या मागे धावले आणि त्याला चेंडू परत करण्याची विनंती केली, पण तो माणूस चेंडू घेऊन पसार झाला.

कुकाबुराचा महागडा चेंडू घेऊन चाहत्याने काढला पळ –

यादरम्यान कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित असलेला आकाश चोप्रा ‘अरे, परत दे यार’ असे म्हणताना दिसला. कुकाबुराचा बॉल खूप महाग आहे भाऊ. मात्र ती व्यक्ती चेंडू घेऊन पळून गेली. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला १४१ धावांवर ऑलआउट केले आणि ६१ धावांनी सामना जिंकला. चाहते चेंडू घेऊन पळून गेल्याच्या घटना अनेकवेळा समोर आल्या आहेत.

हेही वाचा – AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी

u

आता टीम इंडियाचा पुढचा सामना १० नोव्हेंबरला होणार आहे. सेंट जॉर्ज ओव्हल गाकबेर्हा येथे खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ८:०० पासून खेळवला जाईल. सूर्यकुमार यादव आणि कंपनीला हा सामना जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात पुन्हा एकदा सलग २ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतके झळकावणाऱ्या संजू सॅमन्सकडे सर्वांचे लक्ष असेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa south african batter hit six out of the ground to hardik pandya and a man ran away with ball video viral vbm