India vs South Africa Series: दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज डीन एल्गर आगामी भारत विरुद्ध आफ्रिका कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. रॅपोर्ट वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार एल्गर निवृत्तीच्या विचारात आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी ८४ कसोटी खेळलेल्या ३६ वर्षीय खेळाडूने ३७.२८च्या सरासरीने ५१४६ धावा केल्या आहेत. वर्षाच्या सुरुवातीला त्याला कसोटी कर्णधारपदावरूनही काढून टाकण्यात आले आणि टेम्बा बावुमाने कर्णधारपदाची धुरा सांभाळली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, अहवालात असा दावाही करण्यात आला आहे की, एल्गरला विश्वास आहे की तो कसोटी प्रशिक्षक शुक्री कॉनरॅड यांच्या दीर्घकालीन योजनांमध्ये नसावा. रॅपोपोर्टने एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, “या बाबतची माहिती लवकरच बाहेर येईल अशी अपेक्षा आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी एल्गरला कर्णधारपद कसे दिले जाऊ शकते हे आफ्रिकन बोर्डाने पुढे स्पष्ट केले, परंतु शेवटी तसे झाले नाही. एल्गर निवृत्त झाल्यास, सध्याचा दक्षिण आफ्रिका ‘अ’संघाचा कर्णधार टोनी ब्रँड लवकरच संघात सामील होऊ शकतो.”

हेही वाचा: IND vs SA: वनडे मालिकेच्या आयोजनाबद्दल मांजरेकरांनी दक्षिण आफ्रिका बोर्डावर केली टीका; म्हणाले, “टी-२० हंगामात…”

एल्गारला ज्या पद्धतीने वागणूक मिळाली त्यावरून तो नाराज आहे

२०१८ मध्ये, एल्गरने त्याला संघात मिळालेल्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. तो म्हणाला की, त्याने जे काही संघासाठी केले त्यात त्याला फारसे श्रेय दिले जात नाही. इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना तो म्हणाला की, “माझ्या भूतकाळात मी जी काही संघासाठी कामगिरी केली त्याचे मला फारसे श्रेय दिले गेले नाही. माझ्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये फार मोठे नाते आहे असे मला वाटत नाही. बऱ्याच काळापासून, मी ज्या काही खेळी केल्या आहेत त्या सर्व वाहून गेल्या. त्याचा बोर्डाने फारसा विचारच केला नाही. प्रत्येक संघात तुम्हाला माझ्यासारख्या क्रिकेटपटूंची गरज आहे, हे लोक विसरतात.”

भारत आणि आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका कधी होणार?

तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाईल. या मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे. तर दुसऱ्या सामना दोन्ही संघ नवीन वर्षात (२०२४) ३ जानेवारीपासून खेळणार आहेत.

हेही वाचा: गौतम गंभीरचे बाबर आझमच्या कॅप्टन्सीबाबत मोठे विधान; म्हणाला, “आता तो नव्या स्वरुपात…”

पावसामुळे पहिला टी-२० सामना रद्द

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना डरबनमध्ये सततच्या पावसामुळे रद्द करण्यात आला होता. सततच्या पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली. प्रेक्षकांना निराश होऊन परतावे लागले. आता उभय संघांमधला दुसरा सामना १२ डिसेंबरला गेबेरहा येथे होणार असून तिसरा आणि शेवटचा सामना १४ डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे होणार आहे.