India vs South Africa 2nd Test Match: भारतीय क्रिकेट संघ केपटाऊनमधील न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंड (एनएसजी) येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना बुधवार ३ जानेवारी रोजी दुपारी २.०० वाजल्यापासून सुरू होणार आहे. या सामन्यासाठी अनुभवी सुनील गावसकर यांनी भारताच्या प्लेइंग-११ची निवड केली आहे. त्यांनी टीम इंडियात दोन बदल सुचवले आहेत. ते कोणते दोन बदल आहेत, आपण जाणून घेऊ या.
पहिल्या कसोटीत पराभव
भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ०-१ने पिछाडीवर आहे. सेंच्युरियनमधील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात त्यांना एक डाव आणि ३२ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या सामन्याचा निकाल केवळ तीन दिवसात लागला. आता दुसरा आणि अंतिम कसोटी सामना ३ जानेवारीपासून खेळवला जाणार आहे. दरम्यान, भारताचे माजी दिग्गज खेळाडू आणि फलंदाज सुनील गावसकर यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघात दोन बदल सुचवले आहेत.
सुनील गावसकर यांनी सुचवलेले बदल कोणते?
७४ वर्षीय लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सांगितले की, “माझ्या प्लेइंग-११मध्ये फारसे बदल करणार नाही. मात्र, जर रवींद्र जडेजा तंदुरुस्त असेल तर त्याने रविचंद्रन अश्विनच्या जागी संघात यावे. मला वाटतं पहिल्या सामन्यात जडेजाच्या जागी अश्विनचा समावेश करण्यात आला होता, त्यामुळे भारताला तळाला फलंदाजीत त्याची उणीव भासली. तसेच, संघात प्रसिध कृष्णाच्या रूपाने आणखी एक बदल होऊ शकतो. त्याच्या जागी मुकेश कुमार याचा समावेश केला जाऊ शकतो.” गावसकर यांनी दिलेला सल्ला रोहित शर्मा अंमलात आणतो का, हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटीत खेळपट्टी काय रंग दाखवणार?
न्यूलॅंड्स क्रिकेट ग्राउंडवरील बहुतेक सामन्यांचे निकाल लागले, फार कमी सामने अनिर्णित राहिले. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा निकालही येथे लागण्याची शक्यता आहे. चांगली गोष्ट म्हणजे येथे फिरकी गोलंदाजांना मदत मिळणार आहे, ही भारतीय संघासाठी चांगली बातमी आहे.पीच क्यूरेटर म्हणाला की, “खेळपट्टीवर गवत असेल, पहिल्या कसोटीप्रमाणे येथेही वेगवान गोलंदाजांना मदत होईल. तिसऱ्या दिवसानंतर सामन्यात फिरकी गोलंदाजांना देखील मदत मिळेल. पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना मदत होईल, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी फलंदाजांना मदत होईल. येथे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरेल.”
हेही वाचा: IND vs SA 2nd Test: केपटाऊनमध्ये के.एल. राहुल आणि विराट कोहली करणार ‘हा’ खास विक्रम; जाणून घ्या
गावसकर यांच्या मते, दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेइंग-११:
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार आणि मोहम्मद सिराज.