IND vs SA First Match: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तीन टी २० सामन्यांच्या मालिकेला आज म्हणजेच २८ सप्टेंबरला सुरुवात होणार आहे. तिरुवनंतपूरम येथील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर हे दोन संघ आमनेसामने येतील. या मैदानावर भारतीय संघ यापूर्वी दोन टी20 सामने खेळला आहे. भारताने एका सामन्यात विजय मिळवला आहे, तर दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. टी २० विश्वचषकाच्या तयारीसाठी भारताला ही टी २० मालिका महत्त्वाची ठरणार आहे. बीसीसीआयने २३ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या विश्वचषकाला समोर ठेवून हा दौरा आखला आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांच्या टी २० मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला असून गेल्या काही महिन्यात एकदाही न हरलेल्या आफ्रिकेशी भारत आजपासून भिडणार आहे. संध्याकाळी ७ वाजता हा सामना स्टार स्पोर्ट्सवरून प्रसारित केला जाईल. या मालिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि अष्टपैलू हार्दिक पंडय़ा यांना विश्रांती देण्यात आली आहे. तसेच मोहम्मद शमीसुद्धा संघात नसेल, यापूर्वीच दुखापतीमुळे रविंद्र जडेजा सुद्धा स्पर्धेतून बाहेर पडला आहे. टीम इंडिया व दक्षिण आफ्रिकेची संभाव्य बांधणी कशी असणार हे जाणून घेऊयात.

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, शाहबाज अहमद अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

दक्षिण आफ्रिका संघ

क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, टेम्बा बावुमा (क), रिले रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ड्वेन प्रिटोरियस, तबरेझ शम्सी, एनरिक नॉर्टजे, कागिसो रबाडा आणि लुइन रोख.

दरम्यान, यापूर्वी भारतीय संघ २०१९ मध्ये वेस्ट इंडिजच्या विरुद्ध याच मैदानात आमनेसामने आला होता, विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाला या सामन्यात विंडीजने एकतर्फी खेळ दाखवत पराभूत केले होते.

Story img Loader