BCCI shared the video of Rinku Singh in South Africa : दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील आव्हानासाठी टीम इंडियाचे खेळाडू सज्ज आहेत. तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवारी होणार आहे. त्याचवेळी या मालिकेपूर्वी टीम इंडियाचा युवा खेळाडू रिंकू सिंगने आपली प्रतिक्रिया दिली. रिंकू सिंगने सांगितले की, दक्षिण आफ्रिकेचे हवामान अप्रतिम आहे, ते आमचे पहिले सराव सत्र होते, खूप मजा आली. तो म्हणाला की ‘राहुल सरांसोबत काम करायला मिळाले, खूप छान वाटत होतं. सरांनी सांगितले की, तू जसा खेळत आला आहेस, तसाच खेळत रहा आणि स्वतःवर विश्वास ठेव.’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिंकू सिंग पुढे म्हणाला की, ‘राहुल सरांनी सांगितले की, तू जिथे खेळतो त्या पाच आणि सहा क्रमांकावर खेळणे सोपे नसते, पण स्वतःवर आत्मविश्वास ठेवून खेळत राहावे लागते.’ रिंकू सिंगने दक्षिण आफ्रिकेत नेटमध्ये फलंदाजी करताना त्याला कसे वाटले हे देखील सांगितले. रिंकू सिंगने म्हणाला की, ‘भारताच्या तुलनेत दक्षिण आफ्रिकेमध्ये अधिक उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्या आहेत. याशिवाय वेग अधिक आहे, मला वाटले की मी जितका वेग वापर करेल तितके चांगले राहिल.’

याशिवाय रिंकू सिंगने सांगितले की, मी २०१३ पासून उत्तर प्रदेशसाठी मधल्या आणि खालच्या फळीत फलंदाजी करत आहे, त्यामुळे कोणतीही अडचण नाही, आता मी त्या क्रमांकावर जुळवून घेतले आहे.


रिंकू सिंगने सांगितले की, मधल्या फळीत फलंदाजी करणे सोपे नसते, परंतु मी नेहमीच मनाची तयारी करतो आणि स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो. याशिवाय रिंकू सिंगने व्हिडीओमध्ये सांगितले की, सध्या भारतीय संघाचे वातावरण कसे आहे. बीसीसीआयने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपले प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा – WPL 2024 : स्मृती मंधाना ते ऍशले गार्डनरपर्यंत ‘या’ पाच क्रिकेटपटू आहेत डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील सर्वात महागड्या खेळाडू

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारताचा संघ:

यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुनील, रवींद्र जडेजा. कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, दीपक चाहर.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa t20 series bcci has shared the video of rinku singh who is on the tour of south africa vbm