India vs South Africa 3rd T20I Live : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील तिसरा टी ट्वेंटी सामना आज (१४ जून) विशाखापट्टणम येथील एसीए-व्हिडीसीए क्रिकेट स्टेडियमवर झाला. ४८ धावांनी हा सामना जिंकून भारताने मालिकेती आव्हान जिवंत ठेवले आहे. या मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिले होते. भारताने १८० धावांचे आव्हान दिले होत. ते पार करताना आफ्रिकेचा संघ १३१ धावांवर गुंडाळला गेला.

Live Updates
22:22 (IST) 14 Jun 2022
भारतीय संघाचा विजय दृष्टीक्षेपात

आफ्रिकन संघाचा नववा गडी बाद झाला असून भारतीय संघाचा विजय दृष्टीक्षेपात आला आहे. आणखी एक गडी बाद केल्यानंतर हा सामना भारताच्या पारड्यात जाईल.

22:19 (IST) 14 Jun 2022
दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी ठेपाळली

केशव महाराजच्या रुपात भुवनेश्वर कुमारने पाहुण्यांना आठवा झटका दिला. महाराज ११ धावा करून बाद झाला.

https://platform.twitter.com/widgets.js

22:10 (IST) 14 Jun 2022
दक्षिण आफ्रिकेचा सातवा फलंदाज माघारी

दक्षिण आफ्रिकेची अवस्था सात बाद ११३ अशी झाली आहे. फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांच्या शानदार गोलंदापुढे आफ्रिकन फलंदाजांना तग धरता आला नाही.

22:00 (IST) 14 Jun 2022
क्लासेन अडकला चहलच्या जाळ्यात

फिरकीपटू युझवेंद्र चहलने हेनरिक क्लासेनला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकत बाद केले. क्लासेन २९ धावा करून बाद झाला.

21:42 (IST) 14 Jun 2022
डेव्हिड मिलर तीन धावांवर बाद

आफ्रिकेचा किलर फलंदाज डेव्हिड मिलर बाद झाला आहे. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर ऋतुराज गायकवाडने मिलरचा अप्रतिम झेल घेतला.

https://platform.twitter.com/widgets.js

21:32 (IST) 14 Jun 2022
प्रिटोरिअसच्या रुपात आफ्रिकेला चौथा झटका

युझवेंद्र चहलने सामन्यातील दुसरा बळी मिळवत ड्वेन प्रिटोरिअसला बाद केले. या दरम्यान चहल भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळवणारा गोलंदाज ठरला आहे.

21:23 (IST) 14 Jun 2022
डुसेनच्या रुपात आफ्रिकेला तिसरा झटका

युझवेंद्र चहलने रॉसी व्हॅन डेर डुसेनला यष्टीरक्षक पंत करवी बाद केले आहे. डुसेन अवघ्या एका धावेवर बाद झाला.

https://platform.twitter.com/widgets.js

21:18 (IST) 14 Jun 2022
पावरप्लेनंतर आफ्रिकेची दोन बाद ३८ धावांपर्यंत मजल

पावरप्लेनंतर आफ्रिकेने दोन बाद ३८ धावांपर्यंत मजल मारली आहे. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर रिझा हेंड्रिक्स २३ धावा करून बाद झाला.

21:07 (IST) 14 Jun 2022
आफ्रिकन कर्णधार बाद

आफ्रिकन कर्णधार आणि सलामीवीर टेम्बा बावुमाला अक्षर पटेलने माघारी धाडले आहे. तो ८ धावा करून बाद झाला. आवेश खानने त्याचा झेल टिपला.

20:49 (IST) 14 Jun 2022
दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवात

विजयासाठी भारताने दिलेल्या १८० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आफ्रिकन सलामीवीर मैदानात उतरले आहेत. कर्णधार टेम्बा बावुमा आणि रिझा हेंड्रिक्स मैदानात आले आहेत.

20:30 (IST) 14 Jun 2022
भारताचा पाचवा फलंदाज माघारी

भारताचा पाचवा फलंदाज बाद झाला असून दिनेश कार्तिक अवघ्या ६ धावा करून बाद झाला.

20:16 (IST) 14 Jun 2022
कर्णधार ऋषभ पंत स्वस्तात माघारी

कर्णधार ऋषभ पंत स्वस्तात माघारी परतला आहे. प्रिटोरिअसच्या गोलंदाजीवर आफ्रिकन कर्णधार टेम्बा बावुमाने पंतचा शानदार झेल टिपला आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

20:10 (IST) 14 Jun 2022
१५ षटकांमध्ये भारताचा धावफलक तीन बाद १३८ धावांवर

१५ षटकांमध्ये भारतीय संघाने तीन बाद १३८ धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताचे दोन्ही सलामीवीर आणि श्रेयस अय्यर बाद झालेले आहेत. सध्या कर्णधार ऋषभ पंत आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या मैदानात आहेत.

20:05 (IST) 14 Jun 2022
ईशान किशन बाद

ईशान किशनच्या रुपात भारताला तिसरा झटका बसला आहे. सलामीवीर किशनने ३५ चेंडूत ५४ धावांची खेळी केली.

https://platform.twitter.com/widgets.js

20:02 (IST) 14 Jun 2022
भारतीय कर्णधार ऋषभ पंत मैदानात

सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि त्यापाठोपाठ श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार ऋषभ पंत फलंदाजीसाठी मैदानात दाखल झाला आहे. कटकमधील सामन्यात फटकेबाजी करण्याच्या नादात पंत झटपट बाद झाला होता.

20:00 (IST) 14 Jun 2022
श्रेयस अय्यरच्या रुपात भारताला दुसरा झटका

तबरेझ शम्सीच्या गोलंदाजीवर एनरिक नॉर्कियाने श्रेयस अय्यरचा झेल टिपला. श्रेयस १४ धावा करून बाद झाला.

19:53 (IST) 14 Jun 2022
ईशान किशनचे धडाकेबाज अर्धशतक

सलामीवीर ईशान किशनने या मालिकेतील दुसरे आणि टी २० कारकीर्दीतील चौथे अर्धशतक पूर्ण केले आहे.

19:51 (IST) 14 Jun 2022
११ षटकांनंतर भारताचे शतक पूर्ण

११ षटकांनंतर भारतीय संघाने १०० धावा पूर्ण केल्या. सलामीवीर ऋतुराज गायकवाड बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर मैदानात आला आहे.

19:46 (IST) 14 Jun 2022
ऋतुराज गायकवाडच्या रूपात भारताला पहिला झटका

सलामीवीर ऋतुराज गायकवाड अर्धशतक करून बाद झाला. केशव महाराजने त्याला ५७ धावांवर माघारी पाठवले.

https://platform.twitter.com/widgets.js

19:38 (IST) 14 Jun 2022
ऋतुराज गायकवाडचे शानदार अर्धशतक

भारतीय सलामीवीर ऋतुराज गायवाडने शानदार अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने ३० चेंडूंमध्ये आंतरराष्ट्रीय टी २० कारकीर्दीतील पहिले अर्धशतक साजरे केले.

19:27 (IST) 14 Jun 2022
पावरप्लेनंतर भारताचे अर्धशतक पूर्ण

पावरप्लेच्या पहिल्या सहा षटकांमध्ये भारतीय संघाने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे. सलामीवीर ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड मैदानात फटकेबाजी करत आहेत.

18:59 (IST) 14 Jun 2022
भारतीय सलामीवीर मैदानात दाखल

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रण दिले. त्यामुळे भारतीय सलामीवीर ईशान किशन आणि ऋतुराज गायकवाड डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

18:36 (IST) 14 Jun 2022
दोन्ही संघामध्ये कोणताही बदल नाही

भारतीय संघ : ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान.

दक्षिण आफ्रिकेचा संघ : टेम्बा बावुमा (कर्णधार), रीझा हेंड्रिक्स, ड्वेन प्रिटोरियस, रॉस व्हॅन डेर डुसेन, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, वेन पार्नेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, एनरिक नॉर्किया, तबरेझ शम्सी.

18:33 (IST) 14 Jun 2022
दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाजी करण्याचा निर्णय

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

Story img Loader