विराट कोहली हा त्याच्या क्रिकेटमधील विक्रमांसाठी ओळखला जातो. मात्र स्वत:साठी खेळण्यापेक्षा संघासाठी खेळण्यास महत्त्व देणाऱ्या विराटने अनेकदा आपल्या कृतीमधून संघ हा वैयक्तिक कामगिरीपेक्षा अधिक मोठा असल्याचं दाखवून दिलं आहे. असेच एक उदाहरण रविवारी गुवहाटीमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये पाहायला मिळालं.

झालं असं की भारतीय संघ सामन्यात प्रथम फलंदाजी करत असताना शेवटच्या षटकामध्ये विराट आणि दिनेश कार्तिक मैदानावर होते. विराट त्याच्या अर्धशतकापासून केवळ एक धाव दूर होता. मैदानात जमलेले चाहतेही विराटच्या अर्धशतकाची वाट पाहत होता. मात्र विराटने संघाला पहिलं प्राधान्य दिलं. शेवटच्या षटकामध्ये फलंदाजी करत असलेला दिनेश कार्तिक तुफान फटकेबाजी करत होता. एक सुंदर फटका लगावल्यानंतर कार्तिक क्रिजच्या मध्यभागी येऊन विराटला भेटला. दोघांनी एकमेकांना थम्बअप करत प्रोत्साहन दिलं.

कार्तिक काहीतरी विचारत असताना विराटने त्याला हातानेच नको नको म्हणत तू कर फलंदाजी असा इशारा केला. दिनेश कार्तिक विराटला एक धाव कढून ५० धावा करण्यासाठी स्ट्राइक देण्यासंदर्भात विचारपूस करत होता. मात्र विराटने कार्तिकची ही ऑफर नाकारली असं या व्हिडीओवरुन दिसत असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. विराटने काल अर्धशतक साजरं केलं असतं तर त्याचा विक्रम झाला असता. मात्र वैयक्तिक विक्रमांऐवजी संघाला प्राधान्य देत विराटने संघाच्या २०० हून अधिक धावा झाल्यानंतरही सांघिक धावसंख्या वाढवण्यास प्राधान्य दिलं. बीसीसीआयनेही हा व्हिडीओ ट्वीट केला आहे.

विराटच्या या कृतीचं सोशल मीडियावर फार कौतुक होताना दिसत आहे. पाहा काही व्हायरल ट्वीट्स…

१)

२)

३)

४)

५)

विराटने २८ चेंडूंमध्ये नाबाद ४९ धावा केल्या. यामध्ये सात चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ३ बाद २३७  धावा केल्या. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव २० षटकांत ३ बाद २२१ धावांवर आटोपला. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली आहे.

Story img Loader