Ruturaj Gaikwad has dropped out of the Test Series : भारतीय संघ सध्या तिन्ही फॉरमॅटच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये टी-२० आणि एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, तर कसोटी मालिकेला अद्याप सुरुवात झाली नाही. आता कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रिकबझच्या वृत्तानुसार, स्टार फलंदाज विराट कोहली कौटुंबिक कारणामुळे भारतात परतला आहे. प्रिटोरियामध्ये सुरू असलेल्या तीन दिवसीय इंट्रा-स्क्वॉड गेममध्ये कोहली सहभागी होऊ शकला नाही. बीसीसीआयच्या सूत्रांचे म्हणणे आहे की कोहली २६ डिसेंबरपासून सेंच्युरियनमध्ये सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी जोहान्सबर्गला वेळेत परतेल.

विराट कोहली तीन दिवसांपूर्वी मुंबईला रवाना झाला होता. त्यासाठी त्याने बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाची परवानगी घेतली होती. कोहली शुक्रवारी (२२ डिसेंबर) दक्षिण आफ्रिकेत परतण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, १९ डिसेंबर रोजी पोर्ट एलिझाबेथ येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात २६ वर्षीय गायकवाडच्या बोटाला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो पूर्णपणे सावरू शकलेला नाही.

हेही वाचा – IPL 2024 Auction : पॅट कमिन्सला खरेदी करण्यासाठी हैदराबादने २०.५ कोटी रुपये का खर्च केले? अनिल कुंबळेने सांगितले कारण

२६ वर्षीय गायकवाड १९ डिसेंबरला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान जखमी झाला होता. तो अजून बरा झालेला नाही. तिसर्‍या वनडेपूर्वी गुरुवारी बीसीसीआयने ही माहिती दिली होती. आता हे स्पष्ट झाले आहे की, ऋतुराज कसोटी मालिकेदरम्यानही दुखापतीतून पूर्णपणे सावरू शकणार नाही. याच कारणामुळे त्याला कसोटी संघातून मुक्त करण्यात आले आहे. हा युवा फलंदाज शनिवारी भारतात पोहोचणार आहे.

भारताचा कसोटी संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, केएस भरत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाशदीप, मुकेश. जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa virat kohli has suddenly returned home and ruturaj gaikwad has dropped out of the test series vbm