Virat Kohli Jabra Fan: आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटायला चाहते कोणत्याही थराला जाऊ शकतात. फक्त फिल्मी तारेच नव्हे तर भारतात क्रिकेटपटूंची फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याचा असाच एक जबरा फॅन सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यासाठी टीम इंडिया गुवाहाटीला गेली असताना विराटच्या या चाहत्याने शक्कल लढवून त्याची भेट घेतली आहे. बरं या एका भेटीसाठी त्या चाहत्याला तब्बल २३ हजार रुपये मोजावे लागले आहेत.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेतील दुसरा सामना गुवाहाटी मध्ये पार पडला. यापूर्वी टीम इंडियाचे सर्व खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथेच कोहलीच्या या चाहत्याने रूम बुक केली होती. खरंतर यापूर्वी सुद्धा विराटच्या या चाहत्याने त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी विमानतळावर प्रयत्न केला होता मात्र तिथे पोलिसांनी व सुरक्षारक्षकांनी अडवल्याने त्याचे ध्येय अपुरे राहिले. पण बहुधा विराटला भेटायची त्याची इच्छा इतकी प्रबळ होती की त्याने कसाबसा हा योगही जुळवून आणलाच.
गुवाहाटी स्टेडियम जवळील एका सप्त तारांकित (सेव्हन स्टार) हॉटेल मध्ये टीम इंडिया आरामासाठी थांबली होती. तेव्हा त्याच हॉटेलमध्ये सुदैवाने या चाहत्याला एक खोली उपलब्ध असल्याचे समजले. तेव्हा त्याने लगेच ती खोली बुक केली. या खोलीसाठी त्याला तब्बल २३ हजार रुपये मोजावे लागले. विराटच्या या चाहत्याने सांगितले की, जेव्हा मी विराटला ब्रेकफास्टच्या आवारात पाहिले तेव्हा मी त्याला भेटण्यासाठी आवाज दिला पण सुरक्षारक्षकांनी मला पुन्हा अडवून ठेवले. शेवटी मी भूक लागल्याचे व बरे नसल्याचे नाटक केले आणि मग त्यांनी मला तिथूनसोडले . विराटने मला बघून शेवटी बाहेर भेटण्यास सांगितले व इथेच आम्ही फोटो काढला.
विराटच्या या चाहत्याचे नाव राहुल राय असे असून त्याने आतापर्यंत कोहलीचे अनेक फॅन पेज बनवले आहेत. कोहलीचे फोटो कोलाज करून तोया इंस्टाग्राम पेजवर शेअर करतो. त्याच्या एका अकाउंटला तर लाखभर फॉलोवर्सही आहेत. राहुलने आणलेल्या फोटोंच्या कॉलेजवर विराटने शाहीन करून त्याला भेटीची आठवण म्हणून दिली.
विराट कोहलीचा जबरा फॅन
दरम्यान, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात काल विराटने उत्तम खेळी दाखवली. अवघय २८ चेंडूत ४९ धावा करून त्याने भारताच्या विजयात योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सामन्याच्यानंतर विराट आता टी २० क्रिकेटमध्ये ११,००० धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.