IND vs SA VVS Laxman will replace Gautam Gambhir as India coach for tour of South Africa : भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धची सध्याची कसोटी मालिका संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर चार टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ८ नोव्हेंबरला डर्बनमध्ये पहिला टी-२० सामना खेळणार आहे. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी संघ गाकेबरहा येथे जातील. त्यानंतर उर्वरित दोन सामने सेंच्युरियन (१३ नोव्हेंबर) आणि जोहान्सबर्ग (१५ नोव्हेंबर) येथे खेळवले जातील. या दौऱ्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबद्दल मोठा निर्ण घेण्यात आला आहे.

गौतम गंभीर दक्षिण आफ्रिका दोऱ्यावर जाणार नाही –

आता दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. या दौऱ्यात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर भारतीय संघासोबत नसणार आहे. भारतीय संघ ४ नोव्हेंबरच्या सुमारास दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी भारतीय संघ ११ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. अशा स्थितीत गौतम गंभीर केवळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाऊ शकणार आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक –

गौतम गंभीरच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. सोमवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने क्रिकबझला या निर्णयाबद्दल सांगितले. या चार सामन्यांच्या टी-२० मालिकेचा सुरुवातीला निर्णय झाला नव्हता, परंतु बीसीसीआय आणि क्रिकेट दक्षिण आफ्रिका यांच्यातील चर्चेनंतर हा दौरा निश्चित करण्यात आला आहे.

हेही वाचा – IND vs NZ : ‘आता तो काळ गेला…’, लाजिरवाण्या पराभवानंतर विराटसह टीम इंडियाबद्दल एबी डिव्हिलियर्सचे मोठे वक्तव्य

साईराज बहुतुले, हृषिकेश कानिटकर आणि सुभदीप घोष हे देखील दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कोचिंग स्टाफचा भाग असतील. ओमान येथे झालेल्या इमर्जिंग आशिया कप स्पर्धेत बाहुतुले, कानिटकर आणि घोष यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते. दुसरीकडे, सौराष्ट्रचा सितांशु कोटक आणि केरळचा मजहर मोईडू हे भारत अ संघासोबत ऑस्ट्रेलियाला गेले आहेत.

हेही वाचा – IND vs NZ : ‘कागज के शेर घर में हुए ढेर…’, भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या माजी खेळाडूने उडवली खिल्ली

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक –

८ नोव्हेंबर – पहिली टी-२०, डर्बन
१० नोव्हेंबर- दुसरी टी-२०, गेकेबरहा
१३ नोव्हेंबर- तिसरी टी-२०, सेंच्युरियन
१५ नोव्हेंबर- चौथी टी-२०, जोहान्सबर्ग