India vs South Africa, World Cup 2023: भारतीय संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. ती रविवारी (५ नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. उभय संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. टीम इंडियाची नजर सलग आठव्या विजयावर असेल. या विश्वचषकात त्यांनी एकही सामना गमावलेला नाही. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेनेही दमदार कामगिरी केली आहे. त्यांनी सातपैकी सहा सामने जिंकले आहेत. त्यांचा एकमेव पराभव नेदरलँडविरुद्ध झाला.
जर भारत दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना जिंकण्यात यशस्वी ठरला तर गुणतालिकेत पहिल्या स्थानावर राहून उपांत्य फेरी गाठू शकतो. त्यांचा गट फेरीतील शेवटचा सामना १२ नोव्हेंबर रोजी नेदरलँडशी होणार आहे. टीम इंडियाला यावेळी एकही सामना न गमावता वर्ल्ड कप जिंकायचा आहे. २००७ विश्वचषकात ऑस्ट्रेलियन संघाने एकही सामना हरला नव्हता.
उभय संघांमधला हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता खेळवला जाईल. भारतीय संघ विजयी रथावर स्वार झाला असून आतापर्यंत खेळलेले सातही सामने संघाने जिंकले आहेत. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका देखील उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून टेम्बा बावुमाच्या संघाला अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी फक्त एका विजयाची गरज आहे. या सामन्यात दोन्ही संघांची प्लेईंग-११ कशी असेल? जाणून घेऊया.
हेही वाचा: NZ vs PAK: रचिन रवींद्रने रचला इतिहास! बंगळुरूमध्ये शतक ठोकत सचिन तेंडुलकरला टाकले मागे
प्लेइंग-११मध्ये काही बदल होणार का?
हार्दिक पांड्या दुखापतीमुळे वर्ल्ड कप २०२३ मधून बाहेर आहे. त्याच्या जागी प्रसिध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला आहे. आता सर्वांच्या नजरा कृष्णाकडे लागल्या आहेत, त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड होण्याची शक्यता फार कमी आहे. जर आपण संघातील बदलांबद्दल बोललो तर रोहित शर्मा विजयी टीम कॉम्बिनेशनमध्ये कुठलाही बदल करू इच्छित नाही. हार्दिक बाहेर पडल्यानंतर संघ ज्या प्लेइंग इलेव्हनबरोबर खेळत आहे तो चांगला दिसत आहे.
कोलकात्यात पाऊस पडला तर काय होईल?
कोलकात्यात पाऊस पडल्यास सामन्यातील षटके कमी होऊ शकतात. त्यामुळे प्रेक्षकांना संपूर्ण खेळ पाहता येणार नाही. त्याचवेळी पावसामुळे सामना वाहून गेल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जाईल. स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये राखीव दिवसाचा नियम आहे. त्यांना संपूर्ण सामना पाहायला मिळेल. मात्र, उद्याचा सामना पूर्ण व्हावा अशी आशा चाहत्यांना आहे.
दोन्ही संघांपैकी संभाव्य प्लेइंग–११
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, एडन मार्कराम, मार्को जेनसेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.