IND vs SA : भारतीय क्रिकेट संघ आज, २८ सप्टेंबरला दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध मैदानात उतरणार आहेत. संघाची संभाव्य प्लेइंग ११ ची नावे सुद्धा आता समोर आली आहेत. हार्दिक पंड्या व भुवनेश्वर कुमारला विश्रांती देण्यात आली असून, अष्टपैलू रविंद्र जडेजा सुद्धा दुखापतीमुळे संघाच्या बाहेर आहे.सुदैवाने जसप्रीत बुमराह आता ठणठणीत असल्याने संघात खेळणार आहे. मात्र मागील अनेक सामान्यांपासून चाहत्यांना मैदानात मोहम्मद शमीची कमी जाणवत आहे. करोनाचे कारण देऊन शमी खेळत नसल्याचे ऐकून आता चाहते व क्रीडाप्रेमी कंटाळले आहेत. अशाच काहींनी थेट शमीलाच मॅसेज करून तुझा करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल दाखव अशी मागणी केली आहे.

मोहम्मद शमीच्या जागी संघात उमेश यादवला जागा देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी शमीला कोविड-19 ची लागण झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतर याबाबत काहीच अपडेट देण्यात आला नाही. अशातच मागील काही काळात भारतीय गोलंदाजांचा डळमळीत खेळ पाहता चाहत्यांना शमीकडून मोठ्या अपेक्षा आहेत. परिणामी अनेकांनी शमीला कधी संघात घेणार असे प्रश्नही केले आहेत. अखेरीस यावर शमीनेच उत्तर देऊन स्पष्ट माहिती दिली आहे.

Video: तिथे दिप्ती शर्माला नावं ठेवली आणि मग इंग्लंडच्या चार्ली डीनने दुसऱ्याच दिवशी असं काही केलं की..

मोहम्मद शमी पुन्हा कधी खेळणार?

स्त्रीलंपट देशाची शान काय वाढवणार? मोहम्मद शमीच्या पत्नीची टीका; हार्दिक पंड्याचा फोटो शेअर करत म्हणाली…

दरम्यान, शमीने शेवटचा सामना इंग्लंडविरुद्ध खेळला होता. इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल एकदिवसीय सामन्यात त्याने दोन विकेट घेतल्या होत्या. मोहम्मद शमी हा सध्या सोशल मीडियावरून आपल्या फॅन्सच्या संपर्कात असतो, अनेकदा पत्नी हसीन जहाँसह वादामुळेच मोहम्मद शमी चर्चेचा मुद्दा ठरतो.

Story img Loader