IND vs SA Match Head to head and Pitch report Updates: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेल्या टीम इंडियाचा रविवारी ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेशी सामना होणार आहे. या विश्वचषकात दक्षिण आफ्रिका जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेतील सातपैकी सहा सामने मोठ्या फरकाने जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज चांगली फलंदाजी करत आहेत. त्याचवेळी भारतीय गोलंदाज चेंडूने आग ओकत आहेत. पिच रिपोर्ट आणि हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घेऊया.

हेड टू हेड रेकॉर्ड –

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण ९० एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. भारताने ३७ सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेने ५० सामने जिंकले आहेत. तीन सामन्यांचे निकाल लागले नाहीत. विश्वचषकाबद्दल बोलायचे झाले, तर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण पाच सामने खेळले गेले आहेत. यामध्ये दक्षिण आफ्रिकेने तीन सामने जिंकले असून भारताने दोन सामने जिंकले आहेत. २०१५ च्या विश्वचषकात भारताने प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. यानंतर २०१९ च्या विश्वचषकातही भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. गेल्या विश्वचषकात रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले होते.

Mohammed Shami Will Join Team India Squad for Border Gavaskar Trophy After 2nd Test Reveals Childhood Coach IND vs AUS
IND vs AUS: मोहम्मद शमी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात कधी होणार सामील? कोचने दिले अपडेट
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
IND vs SA 3rd T20I Match Stopped Due to Flying Ants engulfed the Centurion Stadium
IND vs SA: ना पाऊस, ना खराब हवामान… चक्क कीटकांनी रोखला भारत-आफ्रिका सामना, मैदानात नेमकं काय घडलं?
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
IND vs AUS Border Gavaskar Trophy Mike Hussey on Gautam Gambhir
IND vs AUS : ‘ते पहिल्याच सामन्यात कळेल…’, गंभीरने पॉन्टिंगची बोलती बंद केल्यानंतर माईक हसीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताला त्रास होईल…’
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?

ईडन गार्डन्स पिच रिपोर्ट –

कोलकात्याच्या ईडन गार्डन्सची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त ठरते. या खेळपट्टीवर चेंडू चांगली उसळी घेतो, त्यामुळे चेंडू बॅटकडे सहज येतो. मात्र, वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. यंदाच्या विश्वचषकात या मैदानावर दोन सामने खेळले गेले आहेत. दोन्ही सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळाली. दोन्ही सामने लो स्कोअरिंगचे झाले. या मैदानावर आतापर्यंत ३७ सामने खेळले गेले आहेत. २१ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत १५ सामने धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. पहिल्या डावाची सरासरी २४० धावा आहे. त्याचवेळी दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या २०१ आहे.

हेही वाचा – IND vs SA, World Cup 2023: भारताविरुद्धच्या सामन्यात काय असेल आव्हान? टेम्बा बावुमाने केला खुलासा

वेदर रिपोर्ट –

हवामानाबद्दल बोलायचे झाले, तर रविवारी कोलकात्याचे हवामान अगदी स्वच्छ असेल. पावसाची कोणतीही शक्यता नाही, ज्यामुळे चाहत्यांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय संपूर्ण सामना पाहण्याचा आनंद घेता येईल . दिवसाचे तापमान २० अंश ते ३२ अंश सेल्सिअस दरम्यान राहील. येथे ६२ टक्के आर्द्रता असू शकते.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.