India vs South Africa ICC Cricket World Cup 2023 Match Updates: भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर रंगणारा सामना क्रिकेट चाहत्यांसाठी खऱ्या अर्थाने सुपर संडे ठरणार आहे. गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकांवर असणाऱ्या आणि सेमीफायनलमध्ये सर्वप्रथम दाखल झालेल्या या दोन संघांमध्ये तुल्यबळ लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ईडन गार्डन्सवरील या सामन्याच्या तिकिटांसाठी क्रिकेटप्रेमींची रीघ लागली नसती तरच नवल! पण यामध्ये झालेल्या घोटाळ्यामुळे हजारो क्रिकेटप्रेमींना तिकिटंच मिळू शकली नसल्याचा दावा केला जात आहे. यासंदर्भात एका चाहत्यानं दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेऊन आता कोलकाता पोलिसांनी थेट बीसीसीआय, कोलकाता क्रिकेट असोसिएशन (CAB) यांना नोटिसा पाठवल्या आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

नेमकं काय झालं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका क्रिकेट चाहत्यानं मैदान पोलीस स्थानकात यासंदर्भात रीतसर तक्रार दाखल केली आहे. बीसीसीआयमधील अधिकारी, कोलकाता क्रिकेट असोसिएशन व ऑनलाईन तिकीटं विकणाऱ्या बुक माय शो या संकेतस्थळानं संगनमतानं हजारो तिकिटं ब्लॅक मार्केटमध्ये उपलब्ध करून दिल्यामुळे सामान्य क्रिकेट चाहत्यांना ही तिकिटं उपलब्ध झाली नाहीत, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

India and South Africa T20 Series Updates in marathi
IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
IND vs NZ Sunil Gavaskar Smashes Plate While Lunch After Seeing Washington Sundar New Ball Against New Zealand Ravi Shastri
IND vs NZ: वॉशिंग्टन सुंदरमुळे सुनील गावसकरांनी जेवताना फोडली प्लेट, रवी शास्त्रींनी कॉमेंट्री करताना सांगितलं नेमकं काय घडलं?
ajit pawar party
मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत अजित पवार गटाची पाटी कोरी
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!
maharashtra assembly election 2024 bjp double standard for action against rebels
Jalgaon Vidhan Sabha Election 2024 : जळगावमध्ये बंडखोरांवरील कारवाईत भाजपचा दुजाभाव; माजी खासदारास अभय

पाकिस्तानच्या विजयामुळे पुन्हा पॉइंट टेबल फिरला; भारताशी भिडण्यासाठी करावी लागेल आकडेमोड!

मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होणार?

यासंदर्भात कोलकाता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी याआधी CAB ला चौकशीसाठी पाचारण करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. त्यानंतर पोलिसांनी BookMyShow या संकेतस्थळाच्या व्यवस्थापनालाही चौकशीसाठी पाचारण केलं. त्यापाठोपाठ आता बीसीसीआयलाही पोलिसांनी नोटीस बजावली असून यातून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दोघांना अटक, तिकिटांची अव्वाच्या सव्वा दरात विक्री!

दरम्यान, गेल्या काही दिवसांत पोलिसांनी दोन व्यक्तींना या सामन्याची तिकिटं अव्वाच्या सव्वा दरात विकण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. त्यातील एकाला बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास अटक करण्यात आली. गुंजन चॅटर्जी असं या २४ वर्षीय तरुणाचं नाव आहे. ९०० रुपयांचं तिकीट तब्बल ४ हजार रुपयांना तो विकत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. अधिक तपास केला असता त्यानं ही तिकिटं मुंबईतील दोन व्यक्तींकडून खरेदी केल्याचं सांगितलं. त्याशिवाय मंगळवारी अंकित अगरवाल नावाच्या ३२ वर्षांच्या व्यक्तीलाही पोलिसांनी अटक केली. २५०० रुपये किंमतीची तिकिटं अंकित तब्बल ११ हजार रुपयांना विकत असल्याचं पोलिसांना लक्षात आलं. ऑक्टोबर महिन्यातही अशाच प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

बीसीसीआयला नोटीस!

दरम्यान, आता पोलिसांनी थेट बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे या प्रकरणात बीसीसीआय किंवा CAB मधील काही अधिकारीही सहभागी आहेत का? याअनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.