१० जानेवारी २०२३ रोजी गुवाहाटी, आसाम येथील बरसापारा क्रिकेट मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिल्या सामन्यात सामना होता. श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने उमरान मलिक, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा पर्याय निवडला आणि युझवेंद्र चहल आणि अक्षर पटेल हे दोन फिरकी गोलंदाज तर हार्दिक पांड्याला अष्टपैलू म्हणून निवडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाहुण्या संघाने यजमानांना फलंदाजीचे आमंत्रण दिले आणि त्यांचा येथेच्छ समाचार घेत यजमानांनी तब्बल ३७४ धावांचा डोंगर उभा केला. रोहित शर्माचा शुबमन गिल सलामीचा जोडीदार होता आणि या जोडीने सुरुवातीपासूनच श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्यांनी अवघ्या १४.५ षटकांतच १०० धावा जोडल्या. गिल आश्चर्यकारकपणे चांगला खेळला आणि त्याचा स्ट्राइक रेट १०० च्या आसपास होता.

पण एक क्षण असा आला की १७व्या षटकात ड्युनिथ वेलल्गेने त्याला जवळपास पायचीत केले. वेलल्गेच्या चेंडूचा बचाव करण्यासाठी शुभमन गिलने पाऊल पुढे टाकले, पण चेंडू त्याच्या पॅडला लागला पण वळला नाही. अंपायरने त्याला बाद दिले नाही. अशा स्थितीत कर्णधार दासून शनाका यष्टिरक्षकाशी बोलला तेव्हा डीआरएस घेण्यात आला, पण रिव्ह्यूमध्ये असे दिसून आले की चेंडू यष्टीला लागला असता, पण त्याचा परिणाम स्टंपसमोर झाला नाही. अशा स्थितीत त्याला नाबाद दिले गेले. पॅडवरील चेंडूचा परिणाम अंपायरच्या कॉलवर बाहेर आला आणि मैदानावरील पंचांनी तो नाबाद दिला होता. चेंडू स्टंपवर आदळत होता, पण इम्पॅक्ट कॉलमुळे तो वाचला.

हेही वाचा: IND vs SL 1st ODI: गुवाहाटीत कोहलीचे ‘विराट’शतक! भारताने श्रीलंकेला विजयासाठी ठेवले तब्बल ३७४ धावांचे आव्हान

दरम्यान, विराट कोहलीची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. गंमत म्हणजे, विराट कोहली, जो पुढचा खेळाडू होता, त्याने हेल्मेट घातले होते आणि प्रथम पॅड असल्याचे पाहून तो मैदानावर उतरण्यास तयार होता. परंतु, जेव्हा अंपायरच्या कॉलचा प्रभाव आला तेव्हा डगआउटमध्ये त्याच्या प्रतिक्रिया मात्र बघण्यासारख्या होत्या.

इशान किशन आणि सूर्यकुमार यादवला संघातून वगळले

रोहित शर्मा याच्यासाठी २०२३ मधील हा त्याचा पहिलाच सामना होता. त्याने वर्षाच्या पहिल्या सामन्यात संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. मात्र शतकापासून अवघ्या १७ धावा दूर असताना दिलशान मधुशंका याने त्याला त्रिफळाचीत केले. तत्पूर्वी रोहित बांगलादेशविरुद्दच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या हाताच्या अंगठ्याला चेंडू लागल्याने तो मागच्या काही महत्वाच्या सामन्यात खेळू शकला नाही. पण मंगळवारी अखेर त्याने संघात पुनरागमन केले. पुणरागनाच्या सामन्यात रोहितचे वैयक्तिक प्रदर्शन अप्रतिम होते, पण सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांना संघातून वगळल्यामुळे सोशल मीडियावर नेटकरी रोहितसह संघ व्यवस्थापनावर संतापल्याचे पाहायला मिळत आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl 1st odi im always ready when shubman gill was not out king kohli was about to enter the field the reaction went viral avw
Show comments