India vs Sri Lanka 1st ODI Match Updates: भारत आणि श्रीलंका यांच्यादरम्यान मर्यादित षटकांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला मंगळवारी (१० जानेवारी) खेळला जात आहे. गुवाहाटी येथील बारसपारा स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकली. विराटने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ४५वे शतक पूर्ण करत भारतीय संघाला ३७३ एवढी मोठी धावसंख्या उभारून दिली. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७३वे शतक ठरले.

या सामन्यासाठी भारताने जेव्हा अंतिम अकरा खेळाडूंची नावे जाहीर केली,तेव्हा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मागील एकदिवसीय सामन्यात द्विशतकी खेळी करणाऱ्या इशान किशनला बाकावर बसवून शुबमन गिलला संधी देण्यात आली. यावरून सोशल मीडियावर वादाला सुरूवात झाली. गिलला का घेतले असा प्रश्न चाहत्यांनी विचारला, मात्र गिलनेही त्यांना नाराज न करता जबरदस्त सुरूवात करत अर्धशतकी खेळी केली. याबरोबरच त्याने मोठा विक्रमही नोंदवला.

Karun Nair ready to make a comeback to Indian team after scored 4 consecutive centuries in Vijay Hazare Trophy 2024-25
Karun Nair : त्रिशतकवीर आठ वर्षानंतर पुनरागमनासाठी सज्ज! सलग चार शतकं झळकावत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
IND W vs IRE W Jemimah Rodrigues century helps Indian womens team register highest ODI score against Ireland
IND W vs IRE W : जेमिमा रॉड्रिग्जच्या पहिल्यावहिल्या शतकाच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, केला ‘हा’ खास पराक्रम
Sam Konstas Reveals Chat with Virat Kohli After On Field Collision Between them
Konstas on Virat Kohli: धक्काबुक्की प्रकरणानंतर कॉन्स्टासने घेतली कोहलीची भेट, म्हणाला; “विराट कोहली माझा आदर्श…”
Mohammed Kaif Statement India Defeat Said You will beat Pakistan in Champions Trophy and will act like we are the best
“पाकिस्तानवर विजय मिळवाल अन्…”, भारताच्या कसोटी मालिका पराभवावर माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाला सुनावलं
Pat Cummins becomes first bowler toTake record 200 WTC wickets in History IND vs AUS Sydney
IND vs AUS: पॅट कमिन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड, WTC च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज
Virat Kohli Angry After Getting Out and Punches Himself in Frustration After Same Dismissal Video
IND vs AUS: विराट कोहलीचा बाद होताच सुटला संयम, झेलबाद झाल्याचे पाहताच स्वत:वरच संतापला अन्… VIDEO व्हायरल
IND vs AUS Virat Kohli did not hit a single four in his first tine 69 ball innings in Test cricket career in Sydney
IND vs AUS : विराट कोहलीचा लाजिरवाणा विक्रम! कसोटी कारकीर्दीत पहिल्यांदाच असं घडलं

रोहित शर्मा व विराट कोहली यांचे संघातील पुनरागमन आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. भारतातच होणाऱ्या या विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी टीम इंडियाची आजपासून खऱ्या अर्थाने अंतिम टप्प्यातील सुरुवात झाली. रोहित शर्मा शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी १४३ धावांची दमदार भागीदारी करताना संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. रोहितचे शतक थोडक्यात हुकले, परंतु त्याने विश्वविक्रमासह अनेक विक्रम मोडले.

शुबमन गिल याने २०१९मध्ये भारताच्या एकदिवसीय संघात पदार्पण केले आणि पहिल्या १६ एकदिवसीय सामन्यांच्या डावांमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय हा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय मध्ये ६० चेंडूत ११ चौकारांच्या सहाय्याने ७० धावा केल्या. याबरोबरच त्याच्या ७५७ धावा पूर्ण झाल्या. हा विक्रम करताना त्याने श्रेयस अय्यर (७४८), नवजोत सिंग सिद्धू (७२५) आणि विराट कोहली (६५५) यांना मागे टाकले आहे.

शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी टीम इंडियाला आश्वासक सुरूवात करून दिली. रोहितने वन डे क्रिकेटमधील ४७ वे अर्धशतक पूर्ण करताना चांगली फटकेबाजी केली. शुबमन गिलने त्याची निवड का केली गेली, हे खेळातूनच दाखवून दिले. ४५ धावांवर असताना वानिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर रोहित पायचीत होता, परंतु मैदानावरील अम्पायरने नाबाद दिल्याने तिसऱ्या अम्पायरनेही Umpire Call दिला अन् भारतीय कर्णधाराला जीवदान मिळाले. १७व्या षटकात शुबमनलाही Umpire Call ने वाचवले. त्यानंतर त्यानेही वन डेतील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी आक्रमक खेळ सुरू ठेवताना १९व्या षटकात १९ धावा चोपल्या. शुबमनने सलग तीन चौकार खेचले, तर रोहितने खणखणीत षटकार मारला. पुढील षटकार दासून शनाकाने भारताला पहिला धक्का दिला. शुबमन ६० चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ७० धावांवर बाद झाला अन् रोहितसोबत त्याची १४३ धावांची भागीदारीही संपुष्टात आली.

हेही वाचा: IND vs SL 1st ODI: नववर्षात विराट कोहलीचे अफलातून शतक! सचिनच्या विक्रमापासून केवळ एक पाऊल दूर, टीम इंडिया मजबूत स्थितीत

केएल राहुल याने कोहलीला ४१ व्या षटकाच्या ५व्या चेंडूवर रजिथाने केएल राहुलला त्रिफळाचीत केले. राहुलने २९ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकार मारत ३९ धावा केल्या. विराट कोहली आणि केएल राहुलच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने ३०० धावांचा पल्ला गाठला. यादरम्यान अर्धशतकी भागीदारीही पूर्ण केली. ३० व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर डिसिल्वाने श्रेयस अय्यरला झेलबाद केले. श्रेयसने २४ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकार मारत २८ धावा केल्या. ४५ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रजिथाने हार्दिकला झेलबाद केले. हार्दिकने १२ चेंडूत १ षटकार लगावत १४ धावा केल्या. ४९ व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रजिथाला कोहलीला बाद करण्यात यश मिळाले. कोहलीने ८७ चेंडूत १ षटकार आणि १२ चौकार मारत ११३ धावा केल्या.

Story img Loader