भारत आणि श्रीलंका संघांत वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने दुखापतीतून बरा होऊन संघात पुनरागमन केले. परंतु रोहित शर्माच्या कुटुंबाकडून दुख:द बातमी समोर आली आहे. रोहित शर्माच्या कुटुंबातील एका सदस्याचे सोमवारी निधन झाले. याबाबतची रोहित शर्माची पत्नी रितिकाने इंस्टाग्रामवर पोस्ट करुन दिली.
रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने त्यांच्या कुत्र्याचे निधन झाल्याचे सांगितले. तिने आपल्या इंस्टाग्रामवर कुत्र्याचे मोहक फोटो शेअर केले आणि भावनिक कॅप्शन लिहिले. “काल आमच्या आयुष्यातील आतापर्यंतचा सर्वात कठीण दिवस होता. आम्ही आमच्या आयुष्यातील प्रेमाचा निरोप घेतला. तुम्ही आतापर्यंतचे सर्वोत्कृष्ट फर्बबी आहात. माझे पहिले प्रेम, माझे पहिले मूल, आतापर्यंतचा सर्वात मऊ फरबॉल.”
रितिकाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘पुन्हा भेटू, आपल्या आयुष्यात नेहमीच थोडी कमी जादू असेल. भारताचा सुपरस्टार सूर्यकुमार यादव, केएल राहुलची मैत्रीण अथिया शेट्टी आणि तिलक वर्मा यांनी या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सामन्याबद्दल बोलायचे तर, रोहित शर्माचे वनडेतील तिसावे शतक अवघ्या १७ धावांनी हुकले. रोहित शर्माने ६७ चेंडूचा सामना करतान ८३ धावा केल्या. ज्यामध्ये त्याने ९ चौकार ३ षटकार लगावले. त्याला दिलशान मदुशंकाने बाद केले.
हार्दिकने श्रीलंकेविरुद्ध भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्व केल्यानंतर, रोहित केवळ एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करेल अशी अफवा पसरली होती. तथापि, एकदिवसीय मालिकेच्या अगोदर, त्याच्या टी-२० भविष्याबद्दलच्या अटकळांना पूर्णविराम दिला. रोहितने घोषित केले की, त्याने या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही.