भारत आणि श्रीलंका संघात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. हा सामना गुवाहाटीत खेळला जातोय. भारतीय संघाने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेला ३७४ धावांचे लक्ष्य दिले. या बरोबरच भारताने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक विश्वविक्रम रचला आहे.
भारतीय क्रिकेट संघाने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे. भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध एक मोठा कारनामा केला आहे. टीम इंडियाने विक्रमी ९व्यांदा श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३५० हून अधिक धावा केल्या. भारताने या विक्रमाच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाला हा कारनामा भारताविरुद्ध केला आहे.
श्रीलंकेविरुद्ध ९व्यांदा ३५०हून अधिक धावा केल्या –
गुवाहाटी येथे श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ५० षटकात ७ गडी गमावून ३७३ धावा केल्या. भारताच्या संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध ९व्यांदा ३५०हून अधिक धावा केल्या आहेत. आता हा नवा विश्वविक्रम झाला आहे.
ऑस्ट्रेलियाला टाकले मागे –
यापूर्वी हा विश्वविक्रम ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या नावावर नोंदवला गेला होता, ज्याने भारताविरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८ वेळा ३५० हून अधिक धावा केल्या होत्या. परंतु आता भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून श्रीलंकेविरुद्ध नवा इतिहास रचला आहे. या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने ११३, रोहित शर्माने ८३, शुबमन गिलने ७० आणि केएल राहुलने ३९ धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले.