IND vs SL 1st ODI Match Tied Due to Umpire: भारत वि श्रीलंका यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका नुकतीच खेळवण्यात आली होती. पण पहिला सामना अनिर्णित राहिला आणि नंतर दोन सामने श्रीलंकेने जिंकल्याने भारताला ही वनडे मालिका गमवावी लागली. पण आता या मालिकेतील पहिला वनडे सामना अनिर्णित राहिल्यावरून एक मोठी बाब समोर आली आहे. दोन्ही संघांची धावसंख्या बरोबरीत आल्यानंतरही सुपर ओव्हर झाली नव्हती. पण पंचांच्या चुकीमुळे सुपर ओव्हर न झाल्याचे पंचांनी मान्य केले आहे.

हेही वाचा – Shakib Al Hasan: “बांगलादेशातील लोकांच्या हत्येला शकीबही जबाबदार…”, पाकिस्तानविरूद्ध मालिकेसाठी निवड होताच शकीब अल हसनवर कठोर शब्दात टीका

karnataka government on sbi pnb banks
“SBI व PNB मधील सर्व खाती बंद करा, ठेवी काढून घ्या”, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय, सरकारी विभागांना दिले आदेश!
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Ajit Pawar On Sharad Pawar
Ajit Pawar : “मी आता ठरवलंय, शरद पवारांबाबत…”, अजित पवार नेमकं काय म्हणाले?
Nurse Rape and Murder
Rape On Nurse : घरी परतणाऱ्या नर्सवर बलात्कार आणि त्यानंतर केली हत्या, एकाला अटक
Atal Setu Viral Video
Atal Setu Viral Video : अटल सेतूवर थरार; रेलिंगच्या पलिकडे उतरलेल्या महिलेला पोलिसांनी वाचवलं, जबानीत म्हणाली, “मी तर…”
Rajiv Kumar on Maharashtra Assembly Election Date Schedule in Marathi
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचं मोठं विधान, म्हणाले…
Chhatrapati Shivaji Maharaj statue collapsed in Malvan
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदलाची पहिली प्रतिक्रिया, दुर्घटनेचं कारण काय?
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?

पंचांच्या चुकीमुळे भारत-श्रीलंका पहिला वनडे सामना बरोबरीत सुटला

ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार, मैदानी पंच जोएल विल्सन आणि रवींद्र विमलासिरी, तसेच रेफ्री रंजन मदुगले, टीव्ही पंच पॉल रायफल आणि चौथे पंच रुचिरा पल्लियागुरुगे यांनी एकदिवसीय सामना टाय झाल्यास सुपर ओव्हर खेळवण्याचा आयसीसीचा नियमाबाबत संभ्रम होता. हा नियम समजून घेण्यात चूक झाल्याचे या पंचांनी आता मान्य केले आहे.

सामना बरोबरीत सुटल्याचे पंचांनी मान्य करताचा दोन्हीपैकी एकाही संघाने सुपर ओव्हर का झाली याबाबत विचारणा केली नाही. पण सोशल मीडियावर एकामागून प्रश्नांचा भडीमार सुरू झाला. आयसीसीचे नियम खणले गेले. या दौऱ्यासाठी श्रीलंका बोर्ड आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांच्यात झालेल्या करारात सुपर ओव्हरला परवानगी होती की नाही, याबाबत पंचांमध्ये संभ्रम होता

हेही वाचा – Shakib Al Hasan: शकीबचा सुपर ओव्हर खेळायला नकार; स्पर्धेतून बाहेर पडण्याची ओढवली नामुष्की-जेतेपदही गमावलं

डिसेंबर २०२३ मध्ये आयसीसीद्वारे जारी केलेल्या वनडे सामन्यातील खेळण्याच्या नवीन नियमानुसार, दोन्ही संघांचे डाव पूर्ण झाल्यास धावसंख्या समान अेल तर सुपर ओव्हर खेळवली जाणार आहे. जर सुपर ओव्हर टाय झाली तर निकाल लागेपर्यंत सुपर ओव्हर खेळवल्या जातील. सुपर ओव्हर देखील टाय राहिल्यास, विजेता ठरेपर्यंत सुपर ओव्हर होतील. विजेता ठरवण्यासाठी सुपर ओव्हर किंवा सामना सामना खेळवता न आल्यास सामना बरोबरीत राहील.

कोलंबोमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात श्रीलंकेने ८ विकेट गमावत २३० धावा केल्या होत्या. टीम इंडियाला २३१ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी शेवटच्या तीन षटकांत पाच धावा हव्या होत्या आणि दोन विकेट शिल्लक होत्या. शिवम दुबेने चौकार मारला, पण ४८व्या षटकात भारताने सतत विकेट गमावल्या, त्यामुळे भारतीय संघ सर्व विकेट गमावून ४७.५ षटकांत केवळ २३० धावाच करू शकला आणि सामना बरोबरीत सुटला. या सामन्यात पंचांनी सुपर ओव्हर खेळवली नाही.