India vs Sri Lanka 1st ODI Match Updates: विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (IND vs SL 1st ODI) शानदार शतक झळकावले. हे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ७३ वे शतक झळकावले. विराटच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ३७३ धावांचा मोठा डोंगर उभारला. तसेच पाहुण्या संघाला विजयासाठी ३७४ धावांचे लक्ष्य दिले. या दरम्यान एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट हार्दिक पांड्याकडे रागाने पाहताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

४३व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ही घटना घडली. विराट कोहलीने लेग साईडला हलक्या हाताने एक चेंडू खेळला, जो चेंडू गॅपमध्ये आणि दोन धावा सहज झाल्या असत्या. मात्र एक धाव पूर्ण केल्यानंतर विराट कोहली दुसऱ्या धावेसाठी अर्ध्या क्रीझवर पोहोचला, तेव्हा त्याला माघारी परतावे लागले. कारण हार्दिक पांड्याने त्याला दुसरी धाव घेण्यासाठी नकार दिला. त्यावेळी हार्दिक पांड्या ऑन स्ट्राइकवर आला होता. त्यावेळी विराट कोहली हार्दिक पांड्याकडे रागाने पाहत असलेला कॅमेऱ्यात कैद झाला.

जेव्हा ही घटना घडली, तेव्हा विराट कोहली ८३ धावांवर खेळत होता. तसेच भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या ७ चेंडूत १० धावा करुन खेळत होता.

विराटने झळकावले शतक –

हेही वाचा – IND vs SL 1st ODI: विराटची सचिनसोबत तुलना केल्याने गंभीरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘सचिन तेंडुलकरने पॉवरप्ले…’

विराट कोहलीने ११३ धावांची विक्रमी खेळी केली. या खेळीत त्याने १ षटकार आणि १२ चौकार लगावले. विराट कोहलीचे हे ७३ वे आंतरराष्ट्रीय शतक होते. विराटचे हे दुसरे बॅक टू बॅक शतक ठरले. याआधी विराटने बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या वनडेतही ११३ धावा केल्या होत्या.
सामन्याबद्दल बोलायचे तर, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद ३७३ धावा केल्या. ज्यामध्ये विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या, त्याने ८७ चेंडूत ११३ धावा केल्या. त्याचबरोबर रोहित शर्माने ८३ आणि शुबमन गिलने ७० धावांचे योगदान दिले. तसेच श्रीलंका संघाकडून कसून रजिथाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.