Virat Kohli’s stunning century: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (१० जानेवारी) खेळला जात आहे. गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने नवीन वर्षात शानदार शतक झळकावले. दोनवेळा त्याला श्रीलंकेने जीवदान देखील दिले. आज दिवस त्याचाच होता असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या सामन्यात विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आणि मालिकेत धावांचा पाऊस पाडत श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू माहेला जयवर्धने याला मागे टाकले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट कोहलीने दमदार फटकेबाजी करत भारताची एक बाजू भक्कम सांभाळून ठेवली. किंग कोहलीला तो ५९ धावांवर खेळत असताना यष्टीरक्षक कुशल मेंडीसने त्याचा झेल सोडला आणि त्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने त्याचा ८९ वर पुन्हा एकदा कव्हर्समध्ये झेल सोडला. खरतर आज विराट कोहलीचा दिवस होता असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. त्याने ८० चेंडूत १०० धावा करत आपले एकदिवसीय प्रकारातील ४५वे शतक पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील त्याचे हे ७३वे शतक आहे. ८७ चेंडूत ११३ धावा करून तो बाद झाला.

तत्पूर्वी, रोहित शर्मा विराट कोहली यांचे संघातील पुनरागमन आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. भारतातच होणाऱ्या या विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी टीम इंडियाची आजपासून खऱ्या अर्थाने अंतिम टप्प्यातील सुरुवात झाली. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी १४३ धावांची दमदार भागीदारी करताना संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. रोहितचे शतक थोडक्यात हुकले, परंतु त्याने विश्वविक्रमासह अनेक विक्रम मोडले.

शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांनी टीम इंडियाला आश्वासक सुरूवात करून दिली. रोहितने वन डे क्रिकेटमधील ४७ वे अर्धशतक पूर्ण करताना चांगली फटकेबाजी केली. शुबमन गिलने त्याची निवड का केली गेली, हे खेळातूनच दाखवून दिले. ४५ धावांवर असताना वानिंदू हसरंगाच्या गोलंदाजीवर रोहित पायचीत होता, परंतु मैदानावरील अम्पायरने नाबाद दिल्याने तिसऱ्या अम्पायरनेही Umpire Call दिला अन् भारतीय कर्णधाराला जीवदान मिळाले. १७व्या षटकात शुबमनलाही Umpire Call ने वाचवले. त्यानंतर त्यानेही वन डेतील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी आक्रमक खेळ सुरू ठेवताना १९व्या षटकात १९ धावा चोपल्या. शुबमनने सलग तीन चौकार खेचले, तर रोहितने खणखणीत षटकार मारला. पुढील षटकार दासून शनाकाने भारताला पहिला धक्का दिला. शुबमन ६० चेंडूंत ११ चौकारांच्या मदतीने ७० धावांवर बाद झाला अन् रोहितसोबत त्याची १४३ धावांची भागीदारीही संपुष्टात आली.

हेही वाचा: IND vs SL 1st ODI: BCCI पडली तोंडावर! काही दिवसांपूर्वी खेळणारा बुमराह मालिकेतून बाहेर, रोहितने दिले स्पष्टीकरण

घरच्या मैदानावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करण्यामध्ये सचिन २० शतकांसह पहिल्या स्थानावर आहे. त्याने घरच्या मैदानावर शेवटचे शतक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०११ मध्ये केले होते. विराटचे भारतात आतापर्यंत १९ आंतरराष्ट्रीय शतके झाली होते. आज त्याने श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावत सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. त्याने १०२ सामन्यात ही कामगिरी केली, तर सचिनला २० शतके करण्यासाठी १६४ सामने लागले. घरच्या मैदानावर सर्वाधिक शतकी खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर हाशिम आमला १४ शतकांसह तिसऱ्या स्थानावर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटींग (१३) चौथ्या स्थानावर आहे.

घरच्या मैदानावर सर्वाधिक शतके करणारे खेळाडू-

सचिन तेंडुलकर – २०

विराट कोहली – २०*

हाशिम आमला – १४

रिकी पॉंटींग – १३

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl 1st odi virat kohlis stunning century on new years just one step away from sachins record team india in a strong position avw