टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना दोन धावांनी जिंकला. पदार्पण सामना खेळणारा शिवम मावी आणि उमरान मलिक यांनी टीम इंडियाला विजय मिळवून दिला. पण या विजयाचा पाया रचण्याचे श्रेय दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांना जाते. त्याचबरोबर या जोडीने १३ वर्षापूर्वीचा एक विक्रम मोडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

टीम इंडियाने १४.१ षटकात पाच विकेट गमावल्या होत्या आणि धावसंख्या फक्त ९४ धावांवर होती. यानंतर दीपक हुडा आणि अक्षर पटेल यांनी मिळून भारताची धावसंख्या ५ विकेट्सवर १६२ पर्यंत नेली. दोघांनी मिळून टीम इंडियाला संकटातून बाहेर काढले आणि आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत नेले. या दोघांच्या जोडीने १३ वर्षांचा महेंद्रसिंग धोनी आणि युसूफ पठाण यांचा विक्रमही मोडला आहे.

हूडा आणि अक्षर आता टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सहाव्या विकेटसाठी सर्वात मोठ्या भागीदारीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. पहिल्या क्रमांकावर विराट कोहली आणि हार्दिक पांड्याची जोडी आहे, ज्यांनी मार्च २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध सहाव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली होती. भारताकडून धोनी आणि पठाणची जोडी तिसऱ्या क्रमांकावर आहे. ज्यांनी २००९ मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध नाबाद ६३ धावांची भागीदारी केली होती.

हेही वाचा – Marnus Labuschagne Lighter: सामना सुरु असतानाच मार्नस लाबुशन मागत होता लाइटर, नंतर आग पेटवली अन्…; पाहा व्हिडीओ

आता हुड्डा-अक्षर जोडी भारताकडून सहाव्या विकेटसाठी टी-२० आंतरराष्ट्रीय मधील सर्वात मोठ्या नाबाद भागीदारीच्या बाबतीत नंबर-१ बनली आहे. या सामन्यात हुडाने २३ चेंडूत नाबाद ४१ तर अक्षर पटेलने २० चेंडूत नाबाद ३ धावा केल्या. अशाप्रकारे भारताने २० षटकात ५ गडी गमावत १६२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ २० षटकात १६० धावांवर सर्वबाद झाला. मालिकेतील दुसरा सामना ५ जानेवारीला होणार आहे