IND vs SL 1st T20I Highlights :भारतीय संघाने श्रीलंका दौऱ्याची सुरुवात दणदणीत विजयाने केली आहे. पहिल्या टी-२० सामन्यात भारताने श्रीलंकेचा ४३ धावांनी पराभव केला. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने पल्लेकेले स्टेडियमवर २१४ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात यजमान संघ १९.२ षटकांत १७० धावांत ऑल आऊट झाला. भारताकडून रियान परागने १.२ षटकांत ५ धावा देत ३ विकेट घेतले. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मोहम्मद सिराज आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा – Paris Olympics 2024: ऑलिम्पिक नगरीत ३ लाखांहून अधिक कॉन्डोमचं वाटप, काय आहे यामागचं कारण
भारताने दिलेल्या २१४ धावांच्या मोठ्या धावसंख्येला उत्तर देताना श्रीलंकेने दणक्यात सुरूवात केली. पथुम निसांका (४८ चेंडूत ७९ धावा) आणि कुसल मेंडिस (२७ चेंडूत ४५ धावा) यांच्यात पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी झाली. १५व्या षटकात श्रीलंकेने तीन गडी गमावून १४९ धावा केल्या होत्या, पण त्यानंतर फलंदाजी बाजू कोलमडली आणि त्यांनी झटपट विकेट गमावल्या. श्रीलंकेच्या शेवटच्या नऊ विकेट ३० धावा करण्यात गमावल्या होत्या. अक्षर पटेलने निसंका आणि कुसल परेराची एकाच षटकात विकेट मिळवत सामना भारताच्या बाजूने वळवला. भारताकडून अर्शदीप, अक्षरने २ तर रियान परागने ३ विकेट घेतल्या. सोबतच सिराज आणि बिश्नोईने प्रत्येकी १ विकेट मिळवली.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने दणक्यात सुरुवात केली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल (४० धावा) आणि शुभमन गिल (३४ धावा) यांनी संघाला पॉवरप्लेमध्ये मोठी धावसंख्या उभारून दिली. सूर्यकुमार (२६ चेंडू, आठ चौकार, दोन षटकार) आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (४९ धावा) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी करत भारताला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले. भारताचा टी-२० कर्णधारपद कायमस्वरूपी बनवल्यानंतर, सूर्यकुमारने आपल्या पहिल्या सामन्यात २६ चेंडूंच्या खेळीत आठ चौकार आणि दोन षटकार ठोकले. यादरम्यान त्याने आपले २०वे अर्धशतक झळकावले.
वानिंदू हसरंगाने संघाला पहिली विकेट मिळवून दिली. त्याच्या गुगलीवर जैस्वाल स्टपिंग होत झेलबाद झाला. दोघांनाही एकाच धावसंख्येवर बाद करून श्रीलंकेने भारताला दुहेरी झटका दिला. चौथ्या क्रमांकावर आलेल्या ऋषभ पंतने संथ सुरूवात केली पण नंतर तुफान फटकेबाजी करत अर्धशतकाच्या जवळ आला. श्रीलंकेकडून मथिशा पाथिरानाने चार तर मधुशंका, असिथा फर्नांडो आणि हसरंगा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
India vs Sri Lanka 1st T20 Live Cricket Score: भारतीय संघाने श्रीलंकाविरूद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात यजमान संघाचा ४३ धावांनी पराभव केला.
२० वे षटक रियान परागला टाकण्याची संधी दिली आणि त्याने यजमान श्रीलंकेला ऑल आऊट करत भारताला शानदार विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. रियान परागने पहिल्या चेंडूवर थीक्ष्णाला क्लीन बोल्ड केलं तर दुसऱ्या चेंडूवर मधुशंकाला क्लीन बोल्ड करत श्रीलंकेला ऑल आऊट केलं. यासह भारताने श्रीलंकेवर ४३ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1817247063157199025
सिराजच्या १९व्या षटकातील पाचव्या चेंडूवर पथिराना अक्षर पटेलकरवी झेलबाद झाला.
१८व्या षटकाच्या अर्शदीपच्या पहिल्या चेंडूवर वानिंदू हसरंगा रियान परागकडून झेलबाद झाला. श्रीलंकेला विजयासाठी १७ चेंडूत ५१ धावाची गरज आहे. तर संघाने १७ षटकांत ६ बाद १६३ धावा केल्या आहेत.
१७व्या षटकातील रियान परागच्या पहिल्याच चेंडूवर सिराजने दासुन शनाकाला धावबाद केले, शनाका येताच एकही धाव न करता पुन्हा परतला. तर रियान परागने भेदक गोलंदाजी करत चौथ्या चेंडूवर कामिंदू मेंडिसला क्लीन बोल्ड केले. मेंडिस १२ धावा करत बाद झाला.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1817243256906006983
रवी बिश्नोईला १६व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर चेंडू चेहऱ्याला लागून दुखापत झाली आहे. चेंडू डोळ्याखाली जोरात आदळल्याने रक्तही आलं. फिजिओ मैदानात येऊन त्यांनी रवीला ड्रेसिंग करत त्याला पट्टी बांधली आणि रवीने मैदान न सोडता पुन्हा गोलंदाजी केली. इतकंच नव्हे तर त्याने शेवटच्या चेंडूवर विकेटही मिळवली आणि असलंकाला झेलबाद केले.
अक्षरच्या १५व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कुसल परेरा झेलबाद झाला. अशारितीने भारताला एका षटकात दोन मोठ्या विकेट मिळाल्या आहेत.
अक्षर पटेलच्या १५व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर अक्षरने तुफान फलंदाजी करत असलेल्या निसंकाला क्लीन बोल्ड केलं आहे. यासह अक्षरने भारताला मोठी विकेट मिळवून दिली आहे. निसंकाने बाद होण्यापूर्वी ४८ चेंडूत ४ षटकार आणि ४ षटकारांसह ७९ धावा केल्या.
पाथुम निसांकाची तुफानी फटकेबाजी सुरूच आहे. भारतीय संघ विकेटच्या प्रतिक्षेत आहे. तर श्रीलंकेने १२ षटकांत १ बाद १३१ धावा केल्या आहेत.
श्रीलंकेचा सलामीवीर पाथुम निसांकाने शानदार फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केले आहे. निसांकाने ३४ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांसह ५४ धावा केल्या आहेत.
१० षटकांत श्रीलंकेने १ बाद ९९ धावा केल्या आहेत. पाथुम निसंका आणि कुसल मेंडिस यांनी संघाला चांगली सुरूवात केली आहे. निसंका ४७ धावांवर खेळत असून अर्धशतकाच्या जवळ आहे. श्रीलंकेला विजयासाठी ५४ चेंडूत १०१ धावांची आवश्यकता आहे.
९व्या षटकातील अर्शदीपच्या चौथ्या चेंडूवर कुसल मेंडिस मोठा फटका खेळण्याच्या नादात सीमारेषेवर यशस्वीकडून झेलबाद झाला. बाद होण्यापूर्वी मेंडिसने २७ चेंडूत १ षटकार आणि ७ चौकारांसह ४५ धावा केल्या.
https://twitter.com/Shebas_10dulkar/status/1817231299016560771
रवी बिश्नोईच्या सातव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर निसांका पायचीत झाल्याचे पंचांनी बाद दिले. पण निसांका लगेचच रिव्ह्यू घेतला आणि त्यात निसांकाला तिसऱ्या पंचांनी नाबाद दिले. यासह 7 षटकांत श्रीलंकेने बिनबाद ६५ धावा केल्या आहेत.
पॉवरप्लेमध्ये श्रीलंकेच्या निसांका आणि मेंडिस यांनी चांगली फलंदाजी करत मैदानात कायम आहेत. भारताचे गोलंदाज विकेट्सच्या प्रतिक्षेत आहेत. पॉवरप्लेमध्ये श्रीलंकेने बिनबाद ५५ धावा केल्या आहेत. मेंडिस २३ तर निसांका ३१ धावा करत खेळत आहे.
श्रीलंकाने २ षटकांत बिनबाद १३ धावा केल्या आहेत. अर्शदीप-सिराजने किफायतशीर गोलंदाजी केली.
भारताने दिलेल्या २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेकडून पाथुम निसांका आणि कुसल मेंडिस ही सलामी जोडी मैदानात आहे. तर अर्शदीपकडून गोलंदाजीला सुरूवात केली आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद २१३ धावा केल्या आहेत. सूर्याचे अर्धशतक, यशस्वी-गिलची ७४ धावांची भागीदारी. ऋषभ पंतच्या ४९ धावांच्या जोरावर भारताने धावांचा डोंगर उभारला आहे. यासह भारताने श्रीलंकेला विजयासाठी २१४ धावांचे आव्हान दिले आहे. यशस्वीने ४०, गिलने ३४, सूर्यकुमारने ५८, पंतने ४९ तर अक्षर पटेल १० तर हार्दिक, पराग आणि रिंकूने काही धावांचे योगदान दिले आहे. अक्षरच्या अखेरच्या षटकातील षटकारासह भारताने २१० धावांचा टप्पा गाठला.
असिथाच्या अखेरच्या षटकातील चेंडूवर रिंकू सिंग क्लीन बोल्ड झाला. यासह भारताने 7 विकेट्स गमावले. पण भारताच्या सर्वच फलंदाजांनी चांगली फलंदाजी करत २०० धावांचा पल्ला गाठला आहे.
ऋषभ पंतने १९ल्या षटकात चौकारांचा पाऊस पाडत तुफान फटकेबाजी केली. पंतच्या फटकेबाजीसह भारताने २०० धावांचा पल्ला गाठला आहे. पण पाचव्या चेंडूवर पाथिरानाकडून पंत क्लीन बोल्ड झाला. १९ षटकांत भारताने ६ बाद २०३ धावा केल्या आहेत.
१७व्या षटकातील पथीरानाच्या तिसऱ्या चेंडूवर हार्दिक पंड्या क्लीन बोल्ड झाला. १५१ किमी प्रति तास वेगाने आलेल्या यॉर्करवर पंड्या बोल्ड झाला. पंड्या १० चेंडूत ९ धावा करत बाद झाला.
भारताकडून हार्दिक पंड्या आणि ऋषभ पंतची जोडी मैदानात आहे. भारताने १५ षटकांत 3 बाद १६० धावा केल्या आहेत.
शानदार अर्धशतकी कामगिरीनंतर सूर्यकुमार यादव पायचीत झाला. मथीशा पथिरानाच्या १४व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादव बाद झाला. बाद होण्यापूर्वी सूर्याने २६ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह ५८ धावा केल्या. यासह १४ षटकांनंतर भारताची धावसंख्या ३ बाद १५३ धावा आहे.
भारताचा नवा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवने श्रीलंका मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात शानदार अर्धशतक झळकावले आहे. सूर्याने २२ चेंडूत ७ चौकार आणि दोन षटकारांसह ५३ धावा केल्या. टी-२० मधील सूर्याचे हे २०वे अर्धशतक आहे तर दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. यासह १३ षटकांनंतर भारताची धावसंख्या २ बाद १४६ धावा आहे.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1817206998636827021
१० षटकांनंतर भारताची धावसंख्या २ बाद १११ धावा आहे. क्रिजवर सूर्यकुमार आणि ऋषभ पंतची जोडी कायम आहे. सूर्या २८ धावा तर ऋषभ पंत ९ धावा करत मैदानात आहे.
९ व्या षटकात सूर्यकुमार यादवने शानदार फटकेबाजी करत १७ धावा केल्या. सूर्याने एक षटकार आणि दोन चौकार लगावत धावांचा पाऊस पाडला. यासह भारताच्या ९८ धावा झाल्या आहेत. तर नवव्या षटकात २ धावा घेताच भारताच्या १०० धावा पूर्ण झाल्या आहेत.
https://twitter.com/MIPaltanFamily/status/1817201803580395955
गिल बाद झाल्यानंतर सातव्या षटकातील हसरंगाच्या पहिल्याच चेंडूवर जैस्वाल स्टंपिंग झाला. यशस्वीने बाद होण्यापूर्वी २१ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४० धावा केल्या.
भारताच्या तरूण सलामी जोडीने पॉवरप्लेमध्येच धावांचा डोंगर उभारला आहे. यशस्वी आणि गिलने पॉवरप्लेमध्येच ७४ धावा केल्या आहेत. पण भारताचा हा आनंद फार काळ टिकला नाही आणि संघाने लागोपाठ दोन्ही सलामीवीरांना गमावले आहे.
पॉवरप्लेमधील शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर शुबमन गिलने मोठा फटका खेळला पण चेंडू हवेत उंच उडाला आणि फर्नांडोने शानदार झेल टिपत यशस्वी-गिलची भागीदारी तोडली आहे.
यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिलच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने अवघ्या ४ षटकांत ५० धावा पूर्ण केल्या आहेत. यशस्वीने चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार लगावत ५० धावा पूर्ण केल्या. यशस्वी ३४ तर गिल १९ धावांवर खेळत आहे.
https://twitter.com/LoyalSachinFan/status/1817195976979013683
भारताची सलामी जोडी शुबमन गिल आणि यशस्वीने पहिल्या ३ षटकांत ४० धावा कुटल्या आहेत. दुसऱ्या षटकात २ चौकार तर तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर दणदणीत षटकार तर दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावत यशस्वीने फटकेबाजी केली. तीन षटकांनंतर भारताची धावसंख्या बिनबाद ३६ धावा आहे. तिसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर यशस्वी पायचीत बाद झाल्याच रिव्ह्यू श्रीलंकेने घेतला, पण त्यांनी रिव्ह्यू गमावला.
यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिलने मिळून पहिल्या षटकातचं १३ धावा केल्या. गिलने २ तर यशस्वीने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत सुरूवात केली.