IND vs SL 1st T20I Highlights :भारतीय संघाने श्रीलंका दौऱ्याची सुरुवात दणदणीत विजयाने केली आहे. पहिल्या टी-२० सामन्यात भारताने श्रीलंकेचा ४३ धावांनी पराभव केला. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने पल्लेकेले स्टेडियमवर २१४ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात यजमान संघ १९.२ षटकांत १७० धावांत ऑल आऊट झाला. भारताकडून रियान परागने १.२ षटकांत ५ धावा देत ३ विकेट घेतले. अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मोहम्मद सिराज आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा – Paris Olympics 2024: ऑलिम्पिक नगरीत ३ लाखांहून अधिक कॉन्डोमचं वाटप, काय आहे यामागचं कारण
भारताने दिलेल्या २१४ धावांच्या मोठ्या धावसंख्येला उत्तर देताना श्रीलंकेने दणक्यात सुरूवात केली. पथुम निसांका (४८ चेंडूत ७९ धावा) आणि कुसल मेंडिस (२७ चेंडूत ४५ धावा) यांच्यात पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी झाली. १५व्या षटकात श्रीलंकेने तीन गडी गमावून १४९ धावा केल्या होत्या, पण त्यानंतर फलंदाजी बाजू कोलमडली आणि त्यांनी झटपट विकेट गमावल्या. श्रीलंकेच्या शेवटच्या नऊ विकेट ३० धावा करण्यात गमावल्या होत्या. अक्षर पटेलने निसंका आणि कुसल परेराची एकाच षटकात विकेट मिळवत सामना भारताच्या बाजूने वळवला. भारताकडून अर्शदीप, अक्षरने २ तर रियान परागने ३ विकेट घेतल्या. सोबतच सिराज आणि बिश्नोईने प्रत्येकी १ विकेट मिळवली.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने दणक्यात सुरुवात केली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल (४० धावा) आणि शुभमन गिल (३४ धावा) यांनी संघाला पॉवरप्लेमध्ये मोठी धावसंख्या उभारून दिली. सूर्यकुमार (२६ चेंडू, आठ चौकार, दोन षटकार) आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (४९ धावा) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी करत भारताला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले. भारताचा टी-२० कर्णधारपद कायमस्वरूपी बनवल्यानंतर, सूर्यकुमारने आपल्या पहिल्या सामन्यात २६ चेंडूंच्या खेळीत आठ चौकार आणि दोन षटकार ठोकले. यादरम्यान त्याने आपले २०वे अर्धशतक झळकावले.
वानिंदू हसरंगाने संघाला पहिली विकेट मिळवून दिली. त्याच्या गुगलीवर जैस्वाल स्टपिंग होत झेलबाद झाला. दोघांनाही एकाच धावसंख्येवर बाद करून श्रीलंकेने भारताला दुहेरी झटका दिला. चौथ्या क्रमांकावर आलेल्या ऋषभ पंतने संथ सुरूवात केली पण नंतर तुफान फटकेबाजी करत अर्धशतकाच्या जवळ आला. श्रीलंकेकडून मथिशा पाथिरानाने चार तर मधुशंका, असिथा फर्नांडो आणि हसरंगा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
India vs Sri Lanka 1st T20 Live Cricket Score: भारतीय संघाने श्रीलंकाविरूद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात यजमान संघाचा ४३ धावांनी पराभव केला.
भारत-श्रीलंकेतील पहिल्या टी-२० सामन्याला सुरूवात झाली आहे. भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे, सलामीसाठी शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी मैदानात आहे. यशस्वीने पहिल्याच चेंडूवर चौैकार लगावत सामन्याला सुरूवात केली आहे.
पाथुम निसांका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरिथ असलंका (कर्णधार), दासुन शनाका, वानिंदू हसरंगा, महेश थीक्ष्णा, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका
शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रियान पराग, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
? Toss and Playing XI ?#TeamIndia will bat first against Sri Lanka in the first T20I ?
— BCCI (@BCCI) July 27, 2024
Follow the Match ▶️ https://t.co/Ccm4ubmoxL#SLvIND pic.twitter.com/sUYeVyzZsE

भारत वि श्रीलंका टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्याची नाणेफेक श्रीलंकेने जिंकली आहे. नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच भारतीय संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल.
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत २९ टी-२० सामने खेळले गेले आहेत. ज्यात भारताने १९ सामने जिंकले, तर श्रीलंकेने ९ सामने जिंकले. एक सामना अनिर्णित राहिला.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, रायन पराग, खलील अहमद, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन, शिवम दुबे.
चरिथ असलंका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (विकेटकीपर), दासुन शनाका, कामिंदू मेंडिस, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेलागे, चामिंडू विक्रमसिंघे, महेश थेक्षाना, दिलशान मदुशंका, मथिशा पेरिनांडो, मथिनेश चंदनाल, कुसल मेंडिस, वनिंदू हसरंगा.
IND vs SL 1st T20 Live Cricket Score: भारत वि श्रीलंका टी-२० मालिकेतील पहिला टी-२० सामना भारतीय संघाने ४३ धावांनी जिंकला. नवा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारताने विजयी सलामी दिली आहे.