IND vs SL 1st T20 Match Updates: भारत आणि श्रीलंका संघात आज टी-२० मालिकेतील पहिला टी-२० सामना खेळला जात आहे. या सामन्याला संध्याकाळी सातला वानखेडे स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने सामन्यांची नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या सामन्यात भारतीय संघाकडून शिवम मावी आणि शुबमन गिल यांना पदार्पणाची संधी मिळाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टी-२० विश्वचषकात भारतासाठी आश्चर्यकारक कामगिरी करणारा अर्शदीप सिंग हा सामना खेळत नाहीये. नाणेफेकीच्या वेळी कर्णधार हार्दिकने सांगितले की तो निवडीसाटी उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्या जागी शिवम मावीला संधी देण्यात आली आहे. अर्शदीपच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाची वेगवान गोलंदाजी कमकुवत झाली आहे.

या सामन्यातून दोन्ही खेळाडूंना भारतीय टी-२० संघाची कॅप देण्यात आली. मावी प्रथमच भारताकडून खेळणार आहे, तर शुबमन गिलने यापूर्वीच कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये आपले फलंदाजीचे कौशल्य दाखवले आहे.

शिवम मावीला अंडर-१९ चे दिवस आठवले –

या मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाज शिवम मावीचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. यानंतर त्याला अंडर-१९ क्रिकेटचे दिवस आठवले. मावीच्या संघाने अंडर-१९ क्रिकेटमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. आता त्याला मावीला देशाच्या वरिष्ठ संघासाठी शानदार कामगिरी करायची आहे.

भारतीय संघ: इशान किशन (यष्टीरक्षक), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, हर्षल पटेल, शिवम मावी, उमरान मलिक आणि युझवेंद्र चहल.

श्रीलंकेचा संघ: पथुम निसांका, कुशल मेंडिस (यष्टीरक्षक), धनंजया डिसिल्व्हा, चरित अस्लंका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महेश तिक्ष्णा, कसून रजिथा आणि दिलशान मदुशानका.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl 1st t20 shivam mavi and shubman gill have got a chance to make their t20 debut from the indian team vbm