भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १६२ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तर देताना पाहुण्या श्रीलंकेचा संघ २० षटकात १० विकेट गमावून १६० धावाच करू शकला. त्यामुळे भारताने २ धावांनी सामना जिंकला. या सामन्यात संजू सॅमसनलाही बऱ्याच कालावधीनंतर छोट्या फॉरमॅटमध्ये स्थान मिळाले होते. पण तो काही विशेष कामगिरी करू शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यष्टिरक्षक फलंदाज सॅमसनला पाच महिन्यांनंतर सर्वात लहान फॉरमॅटच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले, पण तो अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. त्यालाही जीवदान मिळाले पण त्याचा डाव ६ चेंडूंच्या पुढे जाऊ शकला नाही. सातव्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर धनंजय डिसिल्वाने सॅमसनचा झेलबाद केले. त्याने दिलशान मधुशंकाकडे झेल सोपवला.

सॅमसनच्या कामगिरीवर संतापले सुनील गावसकर –

या सामन्यात संजू सॅमसन निर्णायक वेळी आला होता. मात्र त्याने जबाबदारीने खेळी न करता त्याची लवकर बाद झाला. यावर सुनील गावसकर खूप संतापलेले दिसले, ते कॉमेंट्री दरम्यान म्हणाले की, ”यावेळी चेंडू त्याच्या बॅटची बाहेरची किनार घेऊन शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने गेला. तो खूप चांगला खेळाडू आहे. सॅमसनकडे खूप प्रतिभा आहे. पण त्याच्या शॉट निवडीमुळे तो कधीकधी निराश होतो. त्याच्या शॉट सिलेक्शनने पुन्हा निराशा केली आहे.”

हेही वाचा – IND vs SL 1st Test: हुड्डा-अक्षर जोडीने १३ वर्षांपूर्वीचा धोनी-पठाणचा ‘हा’ विक्रम मोडला

विशेष म्हणजे फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणामुळेही सॅमसनला टीकेला सामोरे जावे लागत आहे. त्याने हार्दिक पांड्याने टाकलेल्या पहिल्याच षटकात कुशल मेंडिसचा सोपा झेल सोडला. मेंडिसने तिसऱ्या चेंडूवर लेग साईडच्या खाली शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या कडेला लागून वर उडाला. अशा स्थितीत मिडऑफवर असलेल्या सॅमसनने डायव्ह मारुन झेल टिपण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू हातातून उडाला.