भारताने मंगळवारी श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात भारताने रोमहर्षक विजय मिळवला. भारताने १६३ धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ १६० धावांवर गारद झाला. शेवटच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी १३ धावांची गरज होती. अशा स्थितीत काळजीवाहू कर्णधार हार्दिक पांड्याने २०व्या षटकात फिरकीपटू अक्षर पटेलकडे चेंडू सोपवून सर्वांना आश्चर्यचकित केले. मात्र, हार्दिकचा निर्णय योग्य ठरला आणि अक्षरने केवळ १० धावा केल्या. भारताने हा सामना २ धावांनी जिंकला. या सामन्यात हार्दिकला गोलंदाजीत हवी तशी कामगिरी करता नाही आली, मात्र त्याने एक अनोखा विक्रम नोंदवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीलंकेला हरवल्यानंतर हार्दिकने अक्षरला शेवटचे षटक का दिले याचा खुलासा केला. सादरीकरण समारंभात जेव्हा हार्दिकला अक्षरबद्दल विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “मला या संघाला कठीण परिस्थितीत ठेवायचे आहे जेणेकरून आगामी काळात मोठ्या सामन्यांमध्ये दबावाचा सामना करण्यास मदत होईल.” आम्ही द्विपक्षीय मालिकेत चांगली कामगिरी करत आहोत आणि आता आम्ही अशा प्रकारे आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. खरे सांगायचे तर, सर्व युवा खेळाडूंनी आज आम्हाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले.

हार्दिकने नवोदित वेगवान गोलंदाज शिवम मावीचे कौतुक केले. मावीने श्रीलंकेविरुद्ध मुंबईत झालेल्या सामन्यात ४ षटकात २२ धावा देत ४ बळी घेतले. त्यांनी इतिहासही रचला. पदार्पणाच्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात चार बळी घेणारा मावी हा तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. हार्दिक म्हणाला, “मावीशी अगदी साधे संभाषण झाले. मी त्याला आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहिले आहे आणि त्याची ताकद काय आहे हे मला माहीत आहे. मी त्याला स्वत:वर विश्वास ठेवून गोलंदाजी करण्यास सांगितले आणि जास्त काळजी करू नकोस.”

हेही वाचा: Rishabh Pant Accident : ऋषभ पंतच्या उपचारांबाबत BCCI नं दिली महत्त्वाची माहिती; ‘गरज पडल्यास एअरलिफ्ट करून…’

हार्दिकला जेव्हा विचारण्यात आले की कर्णधार म्हटल्यावर कसे वाटते, तेव्हा तो म्हणाला, “आता कर्णधार म्हणायची सवय झाली आहे.” सामन्यात झेल घेताना झालेल्या क्रॅम्पवरही त्याने प्रतिक्रिया दिली. कर्णधार म्हणाला, “आता मी लोकांना घाबरवत आहे. मला क्रॅम्प येत होते. पण जर मी हसत असेल तर सर्वकाही ठीक आहे. वास्तविक, मला नीट झोप लागली नाही आणि पुरेसे पाणी प्यायले नाही. म्हणून मला थोडा त्रास झाला.” भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी पुण्यात खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून अजेय आघाडी घेण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

हार्दिक पांड्याने केला नवा विक्रम

या सामन्यात भारतीय गोलंदाजीच्या आक्रमणाला हार्दिक पांड्या याने सुरूवात केली. त्याने सामन्यातील पहिले षटक टाकले, ज्यामध्ये त्याने केवळ तीन धावा दिल्या. हार्दिक पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पहिले षटक टाकणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे. त्याच्याआधी भारताच्या आणखी काही कर्णधारांनी सामन्यातील पहिले षटक टाकले आहे, मात्र त्यांनी हे वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये केले आहे. त्यामध्ये कपिल देव, लाला अमरनाथ, अनिल कुंबळे आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे.