भारताच्या टी-२० संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आल्यापासून तो संघामध्ये सातत्याने नवीन प्रयोग करताना दिसतोय. विशेष म्हणजे त्याचे हे प्रयोग यशस्वी होतानाह दिसताय. त्यातच गुरुवारी रोहितने कर्णधार म्हणून एक विश्व विक्रम आपल्या नावे केलाय. रोहित आता नेतृत्व करण्याच्या बाबतीत विराट कोहलीपेक्षाही सरस ठरलाय. यासाठी कारण ठरलंय श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ६२ धावांनी मिळवलेला विजय.

कर्णधार म्हणून रोहितची कमाल…
भारत विरुद्ध श्रीलंका टी-२० मालिकेतील पहिला सामना गुरुवारी भारताने सहज जिंकला. डावखुरा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन (५६ चेंडूंत ८९ धावा) आणि मुंबईकर श्रेयस अय्यर (२८ चेंडूंत नाबाद ५७) यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या बळावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेवर ६२ धावांनी विजय मिळवला. या दमदार विजयाबरोबरच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने सलग १० टी-२० सामने जिंकण्याचा पराक्रम केलाय. श्रीलंकेच्या आधी भारताने न्यूझीलंडविरुद्ध तीन टी-२० सामने जिंकले. त्यानंतर भारताने तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी-२० असे एकूण सहा सामने जिंकत वेस्ट इंडिजच्या संघाला व्हाइट वॉश दिला. हिच विजयी घौडदौड सुरु ठेवत भारताने गुरुवारी श्रीलंकेचा सहज पराभव केला. या विजयासहीत सहीत रोहित हा सलग १० सामने जिंकणारा कर्णधार ठरलाय.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

मॉर्गन आणि विल्यमसनची बरोबरी
श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकल्याने रोहितने घरगुती मैदानावर सर्वाधिक सामने जिंकण्याच्या विक्रमाची बरोबर केलीय. त्याने घरच्या मैदानांवर नेतृत्व करताना १५ टी-२० सामने जिंकलेत. रोहितने आता इंग्लंडचा कर्णधार इयन मॉर्गन आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची बरोबरी केलीय. कर्णधार म्हणून रोहितने भारतामध्ये केवळ एक सामना गमावलाय. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेमध्ये हा विक्रम आपल्या नावे करण्याची सुवर्णसंधी रोहितकडे आहे.

नक्की वाचा >> Ind vs SL: ६२ धावांनी विजय मिळवल्यानंतरही कर्णधार रोहित संघावर नाराज; म्हणाला, “या स्तरावर खेळताना…”

कोहली-धोनीलाही टाकलं मागे…
स्वदेशात टी-२० सामने जिंकण्याच्या बाबतीत रोहितने विराट कोहली आणि कॅप्टन कूल धोनीलाही मागे टाकलं आहे. कोहलीने कर्णधार म्हणून १३ सामने जिंकलेत. तर धोनीने १० सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिलाय. सर्वाधिक विजय मिळवून देणाऱ्या कर्णधारांच्या यादीत आता रोहित पहिल्या, विराट दुसऱ्या तर धोनी तिसऱ्या स्थानी आहे.

भारताची दमदार फटकेबाजी…
भारताने २० षटकांत २ बाद १९९ अशी धावसंख्या उभारली. भारताचे सलामीवीर किशन आणि कर्णधार रोहित शर्मा (४४) यांनी डावाच्या सुरुवातीपासून श्रीलंकन गोलंदाजांवर हल्ला चढवला. त्यांनी १११ धावांची सलामी दिल्यावर रोहितला लाहिरू कुमाराने बाद केले. यानंतर किशन आणि श्रेयस यांनी आक्रमक शैलीतील फलंदाजी सुरू ठेवली. किशनचे शतक हुकले. त्याने ५६ चेंडूंत १० चौकार आणि तीन षटकारांच्या साहाय्याने ८९ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर श्रेयसने फटकेबाजी करत भारताला २०० धावांसमीप पोहोचवले.

गोलंदाजीही भन्नाट…
भारताच्या २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेने २० षटकांत ६ बाद १३७ धावांपर्यंतच मजल मारली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. श्रीलंकेने  सुरुवातीपासून ठरावीक अंतराने गडी गमावले. त्यांच्या अव्वल सहा फलंदाजांपैकी डावखुऱ्या चरिथ असलंकाला (नाबाद ५३) भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार करता आला.

Story img Loader