भारत आणि श्रीलंका संघांत दुसरा वनडे सामना कोलकाता येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारताने ईडन गार्डन्सवर श्रीलंकेला अवघ्या २१५ धावांत गुंडाळले. याचे श्रेय मोहम्मद सिराजच्या शानदार इन-स्विंगला, उमरान मलिकचा वेग आणि चायनामन गोलंदाज कुलदीप यादवच्या फिरकीला दिले जात आहे. सिराज आणि कुलदीपने तीन विकेट्स आपल्या नावावर केल्या. या दरम्यान अक्षर पटेलने शानदार क्षेत्ररक्षण पाहिला मिळाले.
दरम्यान उमरान मलिकही दोन महत्त्वाच्या विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला. या सामन्यात या तिन्ही गोलंदाजांचे खूप कौतुक होत असले, तरी अक्षर पटेल सर्वांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरला. अक्षरने बॅकवर्ड पॉइंटवर तीन शानदार झेल घेतले. त्यामुळेच आता चाहते त्याची तुलना भारताचा फिल्डिंग मास्टर रवींद्र जडेजासोबत करू लागले आहेत.
कर्णधार रोहित शर्माने अष्टपैलू अक्षर पटेलला ईडन गार्डन्सवर बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने ३० यार्ड वर्तुळात तैनात केले होते. अक्षरच्या उत्कृष्ट गोलंदाजीचा आणि फलंदाजीचा नमुना श्रीलंकेच्या फलंदाजांनी टी-२० मालिकेतच पाहिला होता. त्याच्या उत्कृष्ट हवाई फिल्डिंगमुळे तो पहिल्यांदाच चर्चेत आला. अक्षरने येथे उत्तम क्षेत्ररक्षण तर केलेच शिवाय लंकन संघाला पाठीमागे झेल पकडून धावा काढणेही कठीण केले. अक्षरने एक-दोन नव्हे, तर पॉइंटवर एकूण तीन झेल घेतले. त्यामुळे पाहुणा संघ बॅकफूटवर गेला.
अक्षरने २८व्या षटकात लंकन संघाला पहिला धक्का दिला. वनिंदू हसरंगा १७ चेंडूत २१ धावा करून खेळत होता. सुरुवातीच्या विकेट पडल्यानंतरही त्याने धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, उमरान मलिकने वेग बदलला आणि पॉइंटवर उभ्या असलेल्या अक्षर पटेलकडून हा चेंडू हसरंगाने चौकारसाठी मारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अक्षरने डावीकडे एक लांब उडी मारत अप्रतिम झेल घेतला. अशा प्रकारचे अक्षरचे क्षेत्ररक्षण पाहून हसरंगाही थक्क झाला.
हेही वाचा – IND vs SL 2nd ODI: केएल राहुल धोनीची नक्कल करायला गेला अन्…चाहते म्हणाले, ‘क्या धोनी बनेगा तू?’ पाहा VIDEO
अक्षर इथेच थांबला नाही. यानंतर चमिका करुणारत्ने त्याचा पुढचा बळी ठरला. ३४व्या षटकात अक्षर बॅकवर्ड पॉइंटवर वर्तुळात उभा होता. त्यानंतर करुणारत्नेने उमरानच्या उसळत्या चेंडूला अक्षरजवळून चौकार मारण्याचा प्रयत्न केला. तिथेच त्याची चूक झाली. मात्र अक्षरने झेल टिपण्यात कोणतीही चूक केली नाही. यानंतर ४०व्या षटकात दुनिथ विलालेज बाद झाला. सिराजच्या चेंडूवर बॅटचा फेस उघडून तो धाव घेण्याच्या प्रयत्नात होता आणि बॅकवर्ड पॉइंटवर तो अक्षरला हातून झेलबाद झाला.